TRENDING:

मिशीवाली राजकुमारी! 145 तरुणाची लग्नासाठी मागणी, तर 13 जणांनी दिला जीव; कारण आश्चर्यचकीत करेल

Last Updated:

सध्या सोशल मीडियावर एका राजकुमारीचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. हा फोटो पाहिल्यावर तुम्हाला कदाचित ती अगदी सामान्य किंवा आजच्या ब्युटी स्टँडर्ड्समध्ये न बसणारी वाटेल. पण, याच राजकुमारीच्या प्रेमात एकेकाळी शेकडो तरुण वेडे झाले होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : "सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या नजरेत असते," ही म्हण आपण अनेकदा ऐकली असेल. पण आजच्या इन्स्टाग्राम आणि फिल्टरच्या जमान्यात आपण सौंदर्याची व्याख्या खूप मर्यादित करून ठेवली आहे. गोरा रंग, शार्प फिचर्स आणि परफेक्ट फिगर म्हणजेच सौंदर्य, असा एक समज झाला आहे. पण, इतिहासात एक अशी राजकुमारी होऊन गेली जिने या सर्व व्याख्यांना मोडीत काढले होते.
मिशीवाली राजकुमारी
मिशीवाली राजकुमारी
advertisement

सध्या सोशल मीडियावर एका राजकुमारीचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. हा फोटो पाहिल्यावर तुम्हाला कदाचित ती अगदी सामान्य किंवा आजच्या ब्युटी स्टँडर्ड्समध्ये न बसणारी वाटेल. पण, याच राजकुमारीच्या प्रेमात एकेकाळी शेकडो तरुण वेडे झाले होते, इतकेच नाही तर प्रेमभंग झाल्यामुळे अनेकांनी आपला जीवही गमावला होता. कोण होती ही राजकुमारी? आणि का होती तिची एवढी क्रेझ? चला जाणून घेऊया.

advertisement

145 लग्नाचे प्रस्ताव आणि 13 आत्महत्या

ही कहाणी आहे पर्शियाच्या (आत्ताचे इराण) 'कजर' घराण्यातील राजकुमारी जहरा खानम ताझ-एस-सल्तनेह (Princess Zahra) यांची. 1883 मध्ये एका अतिश्रीमंत आणि राजघराण्यात त्यांचा जन्म झाला. व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये पाहिले तर राजकुमारी जहरा यांची शरीरयष्टी जाडजुड होती आणि चेहऱ्यावर मिशांची लव होती. आजच्या काळात लोक कदाचित या लूकला ट्रोल करतील, पण त्या काळात तिची जादू काही औरच होती.

advertisement

राजकुमारी जहरा यांच्याकडे तब्बल 145 पुरुषांनी लग्नाचा प्रस्ताव पाठवला होता. पण जहरा यांनी अनेकांना नकार दिला. इतिहासातील नोंदीनुसार, त्यांच्या नकारामुळे दुखी होऊन 13 आशिकानी चक्क आत्महत्या केली होती. यावरूनच अंदाज येतो की, त्या काळात त्यांचे स्थान आणि प्रभाव किती मोठा होता.

नेमकी काय होती जादू?

जर रूप हे कारण नव्हते, तर लोक त्यांच्याकडे का आकर्षित व्हायचे? याचे उत्तर त्यांच्या बुद्धिमत्तेत आणि धाडसात दडले होते. राजकुमारी जहरा या अत्यंत हुशार आणि प्रगतिशील विचारांच्या होत्या. त्या केवळ राजघराण्यातील स्त्री नव्हत्या, तर एक उत्तम चित्रकार आणि लेखिका होत्या. त्या काळात त्यांनी पाश्चात्य कपडे (Western Clothes) परिधान करण्याचे धाडस दाखवले होते.

advertisement

स्वतःच्या हक्कासाठी आणि इतर महिलांच्या शिक्षणासाठी त्यांनी आवाज उठवला होता. त्या काळातील अनिष्ट रूढी-परंपरांना त्यांनी उघडपणे आव्हान दिले होते. त्यांचे हेच बिनधास्त व्यक्तिमत्व आणि 'ब्युटी विथ ब्रेन' हे कॉम्बिनेशन पुरुषांना भुरळ घालत होते. त्यांची खरी खूबसूरती त्यांच्या हिंमतीत आणि विचारांमध्ये होती.

मिळालेल्या माहितीनुसार, राजकुमारी जहरा यांनी अखेर आपल्या पसंतीच्या व्यक्तीशी (प्रेमीशी) विवाह केला. त्यांचे वडील इराणचे राजे नासिर अल-दीन शाह काजर होते, ज्यांनी इराणवर जवळपास 47 वर्षे राज्य केले. राजांच्या हरममध्ये अनेक राण्या होत्या, पण जहरा यांचे व्यक्तिमत्व त्या सर्वांमध्ये उठून दिसत होते.

advertisement

आज हा फोटो का होतोय व्हायरल?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन आणि मक्याची पुन्हा दर वाढ, कांद्याला आज काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

जेव्हा नेटकऱ्यांनी हा फोटो पहिल्यांदा पाहिला, तेव्हा अनेकांना धक्का बसला. "इतके लोक यांच्यासाठी जीव का देतील?" असा प्रश्न अनेकांना पडला. पण या फोटोमागची खरी कहाणी हेच सिद्ध करते की, खरे सौंदर्य हे शरीराच्या आकारात किंवा चेहऱ्याच्या रंगात नसते, तर ते तुमच्या व्यक्तिमत्वात आणि आत्मविश्वासात असते.

मराठी बातम्या/Viral/
मिशीवाली राजकुमारी! 145 तरुणाची लग्नासाठी मागणी, तर 13 जणांनी दिला जीव; कारण आश्चर्यचकीत करेल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल