फ्लोरिडामध्ये राहणाऱ्या एका जोडप्यालासुद्धा करोडपती व्हायचे होतं, त्यामुळे ते नेहमी लॉटरीची तिकिटे खरेदी करत असायचे. पण एके दिवशी त्यांनी असा पराक्रम केला की त्यांनी लॉटरी तर जिंकली, पण सत्य समोर येताच तुरुंगातही गेले. प्रकरण असं आहे की, या जोडप्याने लॉटरीची दोन तिकिटं एकत्र करून फसवणूक करून लॉटरी जिंकण्याचा प्रयत्न केला होता.
advertisement
न्यूयॉर्क पोस्टच्या अहवालानुसार, लॉटरी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, किरा अँडर्स आणि तिचा प्रियकर डकोटा जोन्स यांनी दोन फाटलेल्या स्क्रॅच-ऑफ तिकिटांना एकत्र जोडून एक दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 8 कोटी 33 लाख रुपयांची लॉटरी जिंकण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेवटी त्यांचा पराक्रम उघड झाला. पेन्साकोला न्यूज जर्नलनुसार, लॉटरी कंपनीने जोडप्याविरुद्ध दाखल केलेल्या पोलीस केसमध्ये असं म्हटलं आहे, की दोन लॉटरीची तिकिटे अर्धी अर्धी फाडली गेली आणि नंतर एका तिकिटाचा वरचा अर्धा भाग दुसऱ्याच्या खालच्या अर्ध्या भागाला चिकटवण्यात आला भाग एकत्र करून नवीन तिकीट तयार करण्यात आलं . परंतु त्यांनी एक चूक केली. तिकिटांचे सीरियल नंबर तपासायला ते विसरले होते आणि या नंबरमुळे ते पकडले गेले. एस्कॉम्बिया काउंटी शेरिफ चिप सिमन्स म्हणाले की एका बाजूला एक सीरियल नंबर होता आणि दुसऱ्या बाजूला दुसरा सीरियल नंबर होता. अशातच या दाम्पत्याची फसवणूक उघडकीस आली.
फॉक्स 35 च्या अहवालानुसार, दोघांनाही या महिन्यात अटक करण्यात आली आणि फसवणूक करण्याच्या हेतूने लॉटरीच्या तिकिटांमध्ये खोटे/फेरफार केल्याचा आणि $100,000 किंवा त्याहून अधिक रकमेची चोरी केल्याचा आरोप ठेवण्यात आला.