TRENDING:

फक्त कॅशमध्येच पेमेंट, सगळीकडे 500-500 च्या नोटा द्यायचे बापलेक; श्रीमंतीचा मार्ग पाहून पोलीसही धक्क्यात

Last Updated:

पिता-पुत्राचे असं कृत्य समोर आलं आहे, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. हे पिता-पुत्र सर्वत्र रोखीनेच पैसे देत असत. मात्र जेव्हा पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकला तेव्हा या रोखीची खरी कहाणी समोर आली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अजमेर : आजचं युग डिजिटल झालं आहे. बरेच लोक आता रोख पैसे घेऊन जाण्याऐवजी ऑनलाइन पेमेंट करतात. मात्र असे असूनही आजही रोखीचे व्यवहार केले जातात. राजस्थानमधील एका पिता-पुत्राला सर्वात महागड्या वस्तूही रोखीने खरेदी करण्याची सवय होती. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे त्यांनी दिलेल्या नोटा नेहमी करकरीत असायच्या. एटीएममधून या नोटा नुकत्याच काढल्यासारख्या वाटायच्या. अशा परिस्थितीत पोलिसांनी तिच्या घरावर छापा टाकला तेव्हा ते आश्चर्यचकित झाली.
News18
News18
advertisement

जयपूरच्या झोटवाडामध्ये राहून पिता-पुत्र असा पराक्रम करत होते, ज्याचा कोणी विचारही केला नव्हता. नानुपुरी कॉलनीत राहणारे सुरेंद्र सिंग आणि त्यांचा मुलगा शिवम सिंग यांना दोघंही गावकऱ्यांना 500 रुपयांच्या नोटा देत आणि त्यांच्याकडून हजारो रुपयांच्या वस्तू विकत घेत. खरेदी केलेल्या मालामध्ये शेळ्या, रेशनच्या वस्तू इ. माल घेतला जात असे. याबाबत एका व्यक्तीला संशय आल्याने त्याने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर असा घोटाळा उघडकीस आला, ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल.

advertisement

डॉक्टरसोबत 4.40 कोटींचा फ्रॉड, मनी लॉन्ड्रिंगची धमकी देऊन खाली केलं अकाऊंट

बापलेकाने काय केलं?

मिळालेल्या माहितीनुसार, 14 ऑगस्ट रोजी त्यांनी एक ट्रक भाड्याने घेतला. यानंतर त्यांनी ट्रकने बेगस गाव गाठलं आणि तिथं 82 शेळ्या खरेदी केल्या. रोख रक्कम भरल्यानंतर त्यांनी ट्रकचालकाकडून माल पाठवला. याबाबत सर्वांनाच संशय आला. कारमध्ये पिता-पुत्र स्वतः होते.

advertisement

बापलेकाचा बनावट नोटांचा अड्डा

पोलीस तिथं आले असता त्यांच्या कारमध्ये 9 लाख रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या. नंतर चौकशीत त्यांनी बनावट नोटा छापण्याचे अड्डे उघड केले जेथे या नोटा तयार केल्या होत्या. हे लोक झोटवाडा येथील एका घरात बनावट नोटा छापत होते. पोलिसांना घरातून नोटा छापण्यासाठी दोन मशीन सापडल्या आहेत. याशिवाय 500 रुपयांच्या 85.94 लाख बनावट नोटाही सापडल्या.

advertisement

डीएसपी अमित कुमार यांनी सांगितले की, आरोपी ए4 शीटवर चार मूळ नोटा चिकटवायचा आणि त्यातून रंगीत कॉपी काढायचा. मग ते कापून वापरायचे.

पत्नीच्या विम्याचे पैसे मिळवण्यासाठी पतीने गाठला क्रूरतेचा कळस! मेव्हण्यासह 4 जणांवर गुन्हा दाखल

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
‘ज्ञानोबा-तुकाराम’चा गजर जर्मनीत, लवकरच होतोय खास सोहळा, तुम्हालाही वाटेल अभिमान
सर्व पहा

या बनावट नोटांनी पिता-पुत्र सर्व वस्तू खरेदी करत होते. गावकऱ्यांना खऱ्या आणि बनावट नोटांमधील फरक समजू शकला नाही आणि ते पिता-पुत्राच्या फसवणुकीचे बळी ठरले. पोलिसांनी बापलेकाला अटक केली आहे.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
फक्त कॅशमध्येच पेमेंट, सगळीकडे 500-500 च्या नोटा द्यायचे बापलेक; श्रीमंतीचा मार्ग पाहून पोलीसही धक्क्यात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल