TRENDING:

पुण्याच्या 'ताशा किंग'ची सोशल मीडियावर हवा, पाचवी पिढी जपतेय लोककलेचा वारसा, Video

Last Updated:

ताशा किंगची पाचवी पिढी देखील वादणाच्या माध्यमातून लोककला जपण्यासाठी प्रयत्न करत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शिवानी धुमाळ, प्रतिनिधी
advertisement

पुणे: वाद्यांमध्ये ताशाची जादू न ओसरणारी आहे आणि ती कायमस्वरूपी राहील. संस्कृती, परंपरेची जपणूक करणाऱ्‍या ताशा वादनात तरुणांना गुंग करण्याचे, आबालवृद्धांना डोलायला लावण्याचे सामर्थ्य आहे. त्यामुळेच डॉल्बीच्या काळातही ताशाची जादू कायम आहे. सध्या समाजमाध्यमांवर पुण्यातील एका ताशाकिंगची हवा आहे. सिराज मणियार यांचे ताशा वाजवतानाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. याबाबतच आपण जाणून घेणार आहोत.

advertisement

कोण आहेत ताशा किंग?

पुणे शहरातील शिरूर तालुक्यातील राहणारे सिराज मणियार हे गेल्या 40 वर्षांपासून ताशा वाजवतात. ताशा वाजवत असताना त्याच्या चेहऱ्याचे हावभाव हे बघण्याजोगे असतात. त्यामुळे ते समाज माध्यमावर देखील खूप प्रसिद्ध आहेत. त्यांचा एक वेगळा चाहतावर्ग आहे. 'गेल्या अनेक वर्षांपासून मी ताशा वादन करत असून मायबाप प्रेक्षकांचं माझ्यावर प्रेम आहे. त्यांच्या प्रेमाने मला प्रोत्साहन मिळतं आणि यामुळे ताशा वाजवत असताना माझ्यात एक वेगळाच उत्साह संचारतो असं सिराज यांनी म्हटलंय.

advertisement

'त्या' अपमानामुळं जिद्दीनं शिकलो गाणं, सचिन पिळगावकर यांना कोण म्हणालं बेसुरा? Video

पाचवी पिढी जपतेय लोककला

गेल्या अनेक वर्षांपासून सिराज हे ताशा वाजवत आहेत त्यांच्या वादनातली सहजतेमुळे प्रेक्षक त्यांच्याकडे आकर्षित होतात. त्यामुळे त्यांना ताशाकिंग हे नावं पडलं आहे. त्यांच्यासाह त्यांचे मणियार कुटुंब हे संगीत कलेशी जोडलं गेलंय. त्यांची पाचवी पिढी देखिल वादणाच्या माध्यमातून लोककला जपण्यासाठी प्रयत्न करत आहे. मणियार कुटूंब पिढ्यानपिढ्या वादनाचे धडे गिरवत असून त्यांच्याकडून देखील आपली लोकवाद्ये जपण्याचा प्रयत्न होईल, असं सिराज मणियार यांनी म्हटलंय.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
पुण्याच्या 'ताशा किंग'ची सोशल मीडियावर हवा, पाचवी पिढी जपतेय लोककलेचा वारसा, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल