कुंभकर्णाच्या झोपेचं रहस्य तज्ज्ञांकडून जाणून घेण्याआधी कुंभकर्णाबाबत थोडी माहिती घेऊया. त्रेता युगात रावणाचा जन्म पुलस्त्य ऋषींच्या कुटुंबात झाला. त्याला कुंभकर्ण आणि विभीषण असे दोन भाऊ होते. कुंभकर्णाचं शरीर अवाढव्य होतं आणि त्याचं सामर्थ्य प्रचंड होतं. पौराणिक कथेनुसार, कुंभकर्ण 6 महिने झोपत असे आणि नंतर फक्त एक दिवस जागा राहायचा. मग तो झोपायला जायचा.
advertisement
कुंभकर्णाच्या झोपेबाबत पौराणिक कथा
तुलसीदासांनी रामचरितमानसमध्ये लिहिलं आहे की रावण, कुंभकर्ण आणि विभीषण यांनी कठोर तपश्चर्या केली होती, ज्यामुळे तिन्ही भावांनी वेगवेगळे वर मागितले होते. रावणाने ब्रह्मदेवाकडून वर मागितला होता की मानव किंवा वानर वगळता कोणीही त्याला मारू शकत नाही, तर विभीषणाने प्रेम आणि भक्ती मागितली होती. कुंभकर्णाने मात्र असं वरदान माहितलं की तो सहा महिने झोपू लागला. खरंतर ब्रह्मदेवाकडून वर मागताना त्याने एक चूक केली होती, त्याचा हा परिणाम होता.
Ramayan : रावणाची लंका खरंच सोन्याची होती? काय सांगतात इतिहास तज्ज्ञ?
रामचरितमानसच्या मते, रावणाला वरदान दिल्यानंतर, जेव्हा ब्रह्माजी कुंभकर्णाकडे आले तेव्हा त्यांनी त्याला वरदान मागण्यास सांगितलं. ब्रह्मदेवाला त्याच्या मनात काय आहे हे माहीत होतं. कुंभकर्णाला इंद्रासन मागायचं होतं. पण जर त्याने इंद्राचं सिंहासन मागितलं असतं तर राक्षसांनी स्वर्ग ताब्यात घेतला असता. मग, जगभर अनीति पसरली असती. हा राक्षस दररोज अन्न खातो, अशाने तर संपूर्ण जग नष्ट होईल. असा विचारही त्यांनी केला.
मग भगवान ब्रह्मदेवाने देवी सरस्वतीचं ध्यान केलं. देवी सरस्वतीने कुंभकर्णाची बुद्धिमत्ता बदलली. कुंभकर्णाने ब्रह्मदेवाकडे इंद्रासनाऐवजी निद्रासन मागितलं आणि ब्रह्मदेवाने त्याला ते वरदान दिलं. त्याला सहा महिने झोप मिळाली.
काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट म्हणतात की, वाल्मिकी रामायणातही ब्रह्मदेवाने कुंभकर्णाला 6 महिने झोपण्याचे वरदान दिल्याची घटना सांगितली आहे. खरंतर, जेव्हा कुंभकर्ण ब्रह्मदेवाकडून वर मागणार होता, तेव्हा त्याच्या जिभेवर देवी सरस्वती प्रकट झाली. या कारणास्तव वर मागताना कुंभकर्णाच्या तोंडातून इंद्रासनाऐवजी निद्रासन हा शब्द बाहेर पडला.
Ramayan : रावणाचा वध करण्यासाठी प्रभू रामाला दिव्यास्त्र कसं मिळालं होतं, कुणी दिलं होतं?
कुंभकर्णाच्या झोपेबाबत इतिहासकार काय सांगतात?
इतिहासकार गिरीश ओक यांनी न्यूज18च्या पॉडकास्टवर माहिती दिली आहे. ते म्हणाले, "कुंभकर्णानेही खूप काम केलं आहे, कुंभकर्णही नीतीवान माणूस होता. कुंभकर्ण इतका झोपायचा ही आपल्याला अतिशयोक्ती वाटते मी अजिबात अतिशयोक्ती नाही. त्याला प्रॉब्लेम होते, त्याला मेडिकल प्रॉब्लेम्स होते."
"कुंभकर्णाची जी स्थिती होती त्याला आता गेल्या 100 वर्षांत आपण क्लेन लेविन सिंड्रोम म्हणतो. ज्यात आताची वर्णनं आणि 14 हजार वर्षांपूर्वीची वर्णनं मिळतात. इतकंच नाही तर त्याची मेडिकल ट्रिटमेंट म्हणजे पेशंट मॅनेजमेंट काय असायला हवी हेसुद्धा रावणाने जे कुंभकर्णाचं पेशंट मॅनेजमेंट केलं. तेच उपचार आता केईएससाठी स्लीप एक्सपर्ट सांगतात. काहीच फरक नाही", असं ते म्हणाले.