अलीकडेच एका जुन्या व्हिडिओने ट्विटर (X) वर पुन्हा एकदा धुमाकूळ घातला. Fascinating नावाच्या युजरने हा व्हिडिओ शेअर केला असून यात दिसणारी नदी म्हणजे 'पुकामायु' (Pukamayu). कुस्को प्रदेशातील एका दरीतून वाहणारी ही नदी ईंटसारख्या लाल किंवा चेरी-रेड रंगाच्या पाण्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. त्यामुळेच स्थानिक लोक तिला ‘ब्लडी रिव्हर’ (Bloody River) म्हणजे ‘खूनाची नदी’ असेही संबोधतात.
advertisement
नदीचं पाणी लाल का दिसतं?
ही नदी खरोखर रक्ताची नदी नाही, तर तिच्या लाल रंगामागे एक शास्त्रीय कारण आहे. नदीजवळील पर्वतांच्या मातीमध्ये आयरन ऑक्साइडचे प्रमाण खूप जास्त आहे. पावसाळ्यात जेव्हा मुसळधार पाऊस पडतो, तेव्हा पर्वतांमधील लालसर माती पाण्यासोबत मिसळते. त्यामुळे पाणी पूर्णपणे लाल, गडद तपकिरी किंवा चेरी-रेड रंगाचं दिसतं. म्हणजेच, ही नदी फक्त रंग बदलते असं नाही, तर तिचा रंग हवामानानुसारही ठरतो.
ही लाल नदी वर्षभर लाल रंगाची नसते. फक्त मॉन्सूनच्या काळात, जेव्हा पाणी जोरात वाहू लागतं तेव्हाच हा लाल रंग पूर्णपणे दिसतो. इतर महिन्यांमध्ये नदीचा रंग साधारण मळकट तपकिरी असतो. या नदीचा उगम प्रसिद्ध पल्कोयो रेनबो माउंटन (Palcoyo Rainbow Mountain) परिसरातून होतो. जे पर्वत सात रंगांसाठी जगभर ओळखले जातात.
शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओला 2.7 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज असून 51,000 पेक्षा अधिक लाइक्स मिळाले आहेत. पहिल्यांदाच लाल रंगाची नदी पाहणारे युजर्स आश्चर्यचकित झाले. अनेकांनी याला 'निसर्गाचा चमत्कार' असं संबोधलं.
