पण तुम्हाला माहितीय का की जगात असं एक पेट्रोल पंप आहे जे खूप मोठं आहे, इथे एकावेळेला 120 गाड्या पेट्रोल भरु शकतात म्हणजे 120 मशिन्स आहेत. पण असं असलं तरी इथे देखील वाहनांच्या रांगा असतात.
आता तुम्ही नक्कीच विचार करत बसला असाल की एवढं मोठं पेट्रोल पंप आहे तरी कुठे? खरंतर हे पेट्रोलपंप कमी आणि शॉपिंग मॉल जास्त वाटतं. तुम्ही याचा फोटो पाहाल तर नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटेल.
advertisement
अमेरिकेतील टेक्सस राज्यातल्या 'लूलिंग' शहरात असलेलं ‘बक-ईज़ (Buc-ee’s)’ हे जगातलं सर्वात मोठं फ्युएल स्टेशन आहे! हे केवळ पेट्रोलपंप नसून, एक संपूर्ण अनुभव आहे – खवय्यांसाठी, प्रवाशांसाठी आणि अगदी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्ससाठीही!
काय आहे खास?
या बक-ईज़मध्ये एक-दोन नव्हे, तर तब्बल 120 पेट्रोल पंप आहेत आणि त्याचा एकूण आकार आहे 75,000 स्क्वेअर फूटांहून अधिक म्हणजे एखाद्या मोठ्या मॉलसारखा.
इन्फ्लुएंसर 'टॉड'चा अनुभव
अलीकडेच एक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर, टॉड (Tod) यांनी या पेट्रोल पंपाला भेट दिली आणि त्याचा अनुभव शेअर केला. त्याच्या म्हणण्यानुसार, "इथे आल्यानंतर वाटलं की आपण एखाद्या फूड फेस्टिवलला आलो आहोत."
टॉड म्हणाला की स्टोअरमध्ये मिठाई, बेकरी आयटम्स, मर्चेंडाइज आणि जगप्रसिद्ध सुपर क्लीन टॉयलेट्स आहेत. इथे स्मोक्ड मीटचा एक खास विभागही आहे. जिथे ताजं ब्रिस्केट तयार केलं जातं.
खवय्यांसाठी स्वर्ग
टॉडने सर्वप्रथम ‘थ्री मीट बन’ ट्राय केला. पाहायला साधं वाटणारं हे सँडविच चवीनं अफलातून होतं. "मी पुन्हा नक्की खाईन! असं त्यांनी सांगितलं.
या स्टोरच्या मागच्या भिंतीवर ड्रिंक्सचे अनेकोनं डिस्पेन्सर आहेत. $4.99 मध्ये ड्रिंक आणि $1.99 मध्ये रिफिल म्हणजे गरमीतील स्वर्ग!
बक-ईज़ची लोकप्रियता
आज अमेरिकेत बक-ईज़चे ५० स्टोअर्स आहेत, त्यातील ३५ फक्त टेक्ससमध्ये. हे बाथरूम्सच्या स्वच्छतेसाठी आणि टेक्सस बारबेक्यूसाठी प्रसिद्ध आहेत.
पूर्वी टेनेसीमधील 'सेवियरविल' बक-ईज़ जगातील सर्वात मोठं फ्युएल स्टेशन मानलं जात होतं. पण आता लूलिंगच्या बक-ईज़ने ती जागा पटकावली आहे.
जगात असंही एक फ्युएल स्टेशन आहे जिथे फक्त पेट्रोल नाही, तर आठवणी मिळतात. भारतात आपण अजून अशी कल्पना करत असतो, तिथं अमेरिकेत पेट्रोल पंप म्हणजे ट्रिपचं एक ‘डेस्टिनेशन’च झाले आहेत.