TRENDING:

₹50 च्या राखीसाठी द्यावे लागणार ₹7000! बहिणीने कुरियर कंपनीला शिकवला चांगलाच धडा, नेमकं प्रकरण काय आहे?

Last Updated:

शकुनबाई ठाकूर यांनी रक्षाबंधनाला आपल्या भावाला राखी कुरिअरने पाठवली होती, मात्र ती वेळेवर पोहोचली नाही. कुरिअर कंपनीने दुर्लक्ष केल्याने शाकुंबाईंनी ग्राहक मंचात तक्रार दाखल केली. तब्बल...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
आपण बऱ्याचदा भाऊ-बहिणींमधील भांडणं आणि गोड-कडू गोष्टी ऐकतो. पण, सागरमधून एक अशी घटना समोर आली आहे, जिथे एका बहिणीने आपल्या भावासाठी तब्बल 19 महिने कोर्टात कायदेशीर लढा दिला. आता न्याय मिळाल्यानंतर या बहिणीची सगळीकडे चर्चा सुरू आहे. झालं असं की, रक्षाबंधनाला भावाला कुरियरने पाठवलेली राखी पोहोचली नाही, तेव्हा बहिणीने कुरियर कंपनीविरोधात थेट गुन्हा दाखल केला. 19 महिन्यांनंतर ग्राहक मंचाने कुरियर कंपनीला 7000 रुपयांचा दंड ठोठावला आहे.
Viral News
Viral News
advertisement

राखी पाठवली, पण कुरियस कंपनीने केला घोळ

ग्राहक मंचात पीडित महिलेची बाजू मांडणारे वकील संतोष सोनी यांनी सांगितलं की, इंद्रजसिंग ठाकूर हे नरयावलीचे रहिवासी आहेत. त्यांच्या पत्नी शकुनबाई ठाकूर यांनी 21 ऑगस्ट 2023 रोजी रक्षाबंधनानिमित्त राजस्थानमधील डिडवाना जिल्ह्यात राहणारे त्यांचे भाऊ नटराज गुजराणिया यांना 'मधुर कुरियर' कंपनीमार्फत राखी पाठवली होती. यासाठी 50 रुपये शुल्क आकारण्यात आले होते आणि त्याची पावतीही देण्यात आली होती. 30 ऑगस्ट 2023 रोजी रक्षाबंधन होतं. मधुर कुरियरच्या कर्मचाऱ्यांनी तोंडी सांगितलं होतं की, रक्षाबंधनाच्या 3 दिवस आधी राखी पोहोचेल. पण, कुरियर पोहोचलेच नाही. त्यांनी कुरियर कंपनीकडे तक्रार केली, पण समाधानकारक उत्तर मिळालं नाही.

advertisement

एवढ्या भरपाईची मागणी

कुरियर कंपनीने कुरियर न तर ठरलेल्या ठिकाणी पोहोचवले, न ते परत केले. यामुळे तक्रारदार आनंदाने आणि उत्साहात रक्षाबंधन साजरा करू शकली नाही. यामुळेच हे प्रकरण कोर्टात दाखल करण्यात आले. अध्यक्ष राजेश कोष्टा आणि सदस्य अनुभा वर्मा यांनी कुरियर कंपनीला, तक्रारदाराला दोन महिन्यांच्या आत 20 रुपये कुरियर शुल्क, सेवेत कमतरता असल्याबद्दल 5000 रुपये वार्षिक 6 टक्के व्याजासह आणि 2000 रुपये खटल्याच्या खर्चापोटी, असे एकूण 7050 रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.

advertisement

ही घटना प्रसिद्ध झाल्यानंतर या बहिणीची खूप चर्चा सुरू आहे. सागरमध्ये लोक म्हणत आहेत की, "अशी बहीण असावी, तिने भावाच्या दुःखाचा पूर्ण हिशोब घेतला. 50 रुपयांच्या राखीसाठी तिने दोन वर्षे लढा दिला आणि तो जिंकला." या घटनेतून एक गोष्ट नक्कीच शिकायला मिळते की, आपल्या हक्कांसाठी लढायला कधीही मागे हटू नये, अगदी ती लहान गोष्ट असली तरीही!

advertisement

हे ही वाचा : 12 वर्षांनी जुळून येतोय त्रिग्रही योग; 'या' 3 राशींचं चमकणार नशीब अन् मिळणार पैसा-प्रमोशन

हे ही वाचा : सहा वर्षांचं प्रेम, एक दिवसाचं लग्न... नवरदेव फोटो सेशनमधूनच झाला गायब; मेहुणीनं टाकलं प्रेमाचं जाळं आणि...

मराठी बातम्या/Viral/
₹50 च्या राखीसाठी द्यावे लागणार ₹7000! बहिणीने कुरियर कंपनीला शिकवला चांगलाच धडा, नेमकं प्रकरण काय आहे?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल