मध्य प्रदेशमधील हे धक्कादायक प्रकरण आहे. मुरैना इथं राहणारा रवींद्र कुशवाह ज्याची वहिनी ओमवती ग्वाल्हेरला राहत होती. त्याची वहिनी त्याला फोन करून घरी बोलतवत होती. एक दिवस असाच तिने त्याला फोन केला आणि आपली मैत्रीण रुक्मिणी राजपूत येणार असून तिची ओळख करून देते असं सांगितलं.
रवींद्र ग्वाल्हेरला वहिनीच्या घरी गेला. तिथं ओमवती आणि रुक्मिणी दोघीही होत्या. तिघांनीही जेवण केलं. नंतर ओमवतीने त्या दोघांनी इथं थांबणं योग्य नसून त्या दोघांना रुक्मिणीचा भाऊ आदित्यच्या घरी जायला सांगितलं. ते दोघं गोवर्धन कॉलनीत गेले. इथं रवींद्र आणि रुक्मिणीला एका खोलीत एकटं सोडण्यात आलं. सुरुवातीला सगळं नीट होतं. पण रात्री अकराच्या सुमारास ओमवती तीन पुरुषांसह तिथं आली. कौशल परमार, अंकित वर्मा, आदित्य भदोरिया अशी त्यांची नावं.
advertisement
हॉस्टेलची बंद खोली, आत 2 तरुणी; बनवला असा VIDEO, तब्बल 2000000 लोकांनी पाहिला
रवींद्र आणि रूक्मिणी दोघंच होते त्या खोलीत आधीपासूनच कॅमेरा लावलेला होता. ज्यात सगळं काही रेकॉर्ड केलं होतं. पैसे दिले नाही तर हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. रवींद्रने नकार दिल्यावर त्याला मारहाण करण्यात आली.
एफआयआरनुसार रवींद्रने सांगितलं की त्यांनी त्याला खोट्या बलात्काराच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली आणि 10 लाख रुपयांची मागणी केली. तीन तरुणांनी त्याला ओलीस ठेवलं आणि त्याचे हातपाय दोरीने बांधले. त्यांनी त्याला मारहाण केली. त्याचा मोबाईल फोन, 8000 रुपये रोख, त्याचा फोनपे पासवर्ड आणि त्याची बाईक हिसकावून घेतली. नंतर तो पैशाची व्यवस्था करण्याच्या बहाण्याने पळून जाण्यात यशस्वी झाला. एका वाटसरूच्या मदतीने त्याने त्याच्या भावाला फोन करून माहिती दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार ग्वाल्हेर गोल का मंदिर पोलीस स्टेशन परिसरात हनी ट्रॅपिंग आणि ब्लॅकमेलिंगचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणाला त्याच्याच वहिनीने तिच्या महिला साथीदारासह आणि इतर तीन जणांसह अडकवलं. आरोपीने खोट्या बलात्काराच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन त्याच्याकडून 10 लाख रुपयांची मागणी केली.
याप्रकरणी एकूण 5 आरोपी आहेत. दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. मुख्य आरोपी ओमवती आणि तिचे इतर दोन साथीदार फरार आहेत. पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे.