शाळा मुलांना हे काय करायला लावतेय! पुण्यातील आठवीच्या मुलाचा रात्रीचा 12 वाजताचा VIDEO! पाहताच वडिलांचा संताप

Last Updated:

Father son video viral : पुण्यातील एका व्यक्तीने त्याच्या मुलाचा सोशल मीडियावर शेअर केलेला हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.

प्रतीकात्मक फोटो (AI Generated Image)
प्रतीकात्मक फोटो (AI Generated Image)
नवी दिल्ली : लहान मुलांचे कितीतरी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सगळ्याचंं लक्ष वेधून घेत आहे. वडिलांनी शेअर केलेला मुलाचा हा व्हिडीओ. ज्यात रात्री 12 वाजताच मुलगा असं काही करताना दिसला की वडील संतापले आहेत. त्यांनी मुलाच्या या कृत्यामुळे शाळेवर संताप व्यक्त केला आहे. असं या व्हिडीओत नेमकं काय आहे? या मुलाने असं काय केलं आहे.
पुण्यातील ही व्यक्ती, नितीन धर्मावत असं तिचं नाव आहे. त्यांनी त्यांच्या मुलाचा व्हिडीओ एक्स या सोशल मीडियावर शेअर केला आहे.  व्हिडीओत तुम्ही जमिनीवर काही पेपर पाहाल. वेगवेगळ्या रंगाचे हे पेपर.
व्यक्तीने पोस्टमध्ये सांगितलं आहे की, रात्री 12 वाजले आहेत. आठवी इयत्तेचा मुलगा त्याचा गृहपाठ झाल्यानंतर तो नॉनसेन्स प्रोजेक्ट करतो आहे. जर त्याने ते केलं नाही तर त्याला त्याच्या आवडत्या पीई पीरियडमध्ये सहभागी होता येणार नाही अशी भीती. दररोज रात्री 12-1230 पर्यंत तो जागतो. एक पालक म्हणून अशा वाईट व्यवस्थेसमोर मला खूप असहाय्य वाटतं. मी नेहमीच याच्या विरोधात होतो पण आज आता तेच माझ्या मुलालाही सहन करावं लागत आहे.
advertisement
बऱ्याचदा मुलांना शाळेत प्रोजेक्ट मिळतात, जे पूर्ण करणे मुलांसाठी आणि पालकांसाठी त्रासदायक ठरतं. दररोज पालक या प्रोजेक्ट्सबद्दल शाळेत तक्रार करतात की शिक्षक मुलांना इतके प्रोजेक्ट आणि असाइनमेंट का देतात की त्यांच्यावर जास्त भार पडतो. या संदर्भात पुण्यातील एका वडिलांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement
advertisement
नितीन धर्मावत यांनी आपल्या @niteen_india एक्स अकाऊंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. नितीन यांच्या प्रोफाईलनुसार ते पुण्यातील आहेत.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक पालकांनी कमेंट सेक्शनमध्ये धर्मवत यांच्याशी सहमती दर्शवली आणि त्यांचे स्वतःचे अनुभव शेअर केले.  अनेक पालकांनी मुलांना दिलेल्या प्रकल्पांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की ते त्यांच्याकडून काहीही शिकत नाहीत, उलट त्यांचा वेळ वाया घालवतात. ते रात्रभर जागून ते पूर्ण करतात, ज्यामुळे त्यांची झोप उडते. यामुळे पालकांनाही समस्या निर्माण होतात.
view comments
मराठी बातम्या/Viral/
शाळा मुलांना हे काय करायला लावतेय! पुण्यातील आठवीच्या मुलाचा रात्रीचा 12 वाजताचा VIDEO! पाहताच वडिलांचा संताप
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement