सापांचं वयोमान अगदी 100 वर्षे पृथ्वीवर माणसांबरोबरच अनेक प्राणी, कीटक राहतात. त्यापैकी काही अतिशय धोकादायक असतात. विशेषतः माणसांना त्यांच्यापासून धोका जास्त असतो. अशा प्राण्यांमध्ये सापाचा समावेश होतो. दर वर्षी अनेक माणसं सापाच्या दंशाने मृत्युमुखी पडतात. मजूर, शेतकरी, कामगार यांचा सर्पदंशाने मृत्यू होण्याचं प्रमाण जास्त असतं. जगभरात सापाच्या अनेक प्रजाती आढळतात. सर्वसाधारणपणे हे साप 12 ते 18 वर्षं जगतात; मात्र पकडलेल्या सापांच्या आणि जंगलातल्या सापांच्या आयुर्मानात फरक आढळतो.
advertisement
पृथ्वीवर असलेल्या विषारी व धोकादायक प्राण्यांमध्ये सापाचा समावेश होतो. जगभरात दर वर्षी सरासरी 1,38,000 नागरिकांचा सर्पदंशाने मृत्यू होतो. सापाच्या दंशामुळे होणाऱ्या मृत्यूंची ही संख्या वाघ, सिंह, हत्ती, हिप्पोपोटॅमस आणि मगरींमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या तुलनेत खूप जास्त आहे.
जगभरात सापांच्या अनेक विषारी प्रजाती आढळतात. त्यात इनलँड तायपन, ब्लॅक माम्बा, रसेल्स व्हायपर, किंग कोब्रा, इस्टर्न ब्राउन स्नेक या प्रजातींचा समावेश आहे. हे साप इतके विषारी असतात, की त्यांच्या विषाचा एक थेंबही माणसाचा जीव घेण्यासाठी पुरेसा असतो. सापांचं आयुर्मानही वेगवेगळं असतं. पकडलेले साप आणि जंगलातले साप यांच्या आयुर्मानात फरक असतो. एक साप जास्तीत जास्त किती वर्षं जगतो, याबाबत तुम्हाला कल्पना आहे का?
किती वर्षं जगतात साप?
सापांचं वय वेगवेगळं असतं. खरं तर साप जंगलातच राहतात; पण काही सापांना पकडलं जातं. हे साप प्राणिसंग्रहालयात ठेवले जातात. अशा पकडलेल्या सापांचं आणि जंगलात राहणाऱ्या सापांचं आयुर्मान वेगवेगळं असतं. मूलतः निसर्गात राहणाऱ्या प्राण्यांचं आयुर्मान तिथेच जास्त असेल असं वाटू शकतं, पण तसं नाही. जंगलात राहणाऱ्या सापांचं आयुर्मान कमी असतं. त्या तुलनेत पकडलेल्या सापांचं आयुर्मान जास्त असतं. Reptilekingdoms.com च्या एका वृत्तानुसार, पकडलेल्या सापांचं सरासरी आयुर्मान 13 ते 18 वर्षं असतं, तर जंगलात राहणारे साप सरासरी 10 ते 15 वर्षं जगतात. एका रिपोर्टनुसार, बॉल पायथॉन (Ball Python) प्रजातीचे साप इतर सापांच्या तुलनेत सगळ्यात जास्त वर्षं जगतात. या सापांना पकडलं तर ते 25 ते 30 वर्षांपर्यंत जगू शकतात.
एका रिपोर्टनुसार, गॅरी नावाचा एक बॉल पायथॉन साप 42 वर्षं जगला होता. एका महिलेनं त्या सापाला पाळलं होतं. आजपर्यंत गॅरी वगळता इतर कोणताही साप इतकी वर्षं जगला नाहीये. त्यामुळे याला चमत्कारच मानलं गेलं आहे. तसंच त्याचा एक जागतिक विक्रमही झाला आहे.