दिव्यांश चौकसे सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह होता. त्याचं ncert.gyan नावाचं इन्स्टाग्राम अकाऊंट आहे. ज्याचे 5 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. मूळचा रायसेनचा असलेला दिव्यांश पत्रकारितेचं शिक्षण घेण्यासाठी भोपाळमध्ये आला होता. माखनलाल चतुर्वेदी नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ जर्नालिझम अँड कम्युनिकेशन (एमसीयू) मध्ये मास क्युनिकेशनच्या पहिल्या वर्षात तो शिकत होता आणि एका वृत्तपत्रासाठी काम करत होता. सोशल मीडियावरूनही त्याला चांगलं उत्पन्न मिळत होतं.
advertisement
दिव्यांशचा मृत्यू कसा झाला?
गुरुवारी 30 ऑक्टोबर रोजी दिव्यांश एमसीयूच्या तिसऱ्या मजल्यावरून पडला आणि त्याचा मृत्यू झाल्याचं वृत्त आलं. विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी दिव्यांशला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केलं. जाहिरात आणि जनसंपर्क विभागाच्या प्रमुख डॉ. पवित्रा श्रीवास्तव यांनी सांगितलं की, दिव्यांश हा चुकून तिसऱ्या मजल्यावरून पडला. त्याला गंभीर दुखापत झाली. त्याला लगेच हजेला रुग्णालयात नेण्यात आलं. तिथं त्याच्यावर प्राथमिक उपचार झाले. नंतर त्याला अपोलो सेज रुग्णालयात हलवण्यात आलं. जिथं शुक्रवारी (31 ऑक्टोबर) रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर लगेचच कुटुंबालाही माहिती देण्यात आली.
दिव्यांशचे वडील रायसेनमधील एका गावात पिठाची गिरणी चालवतात. त्याची आई गृहिणी आहे. दोन्ही पालक अपंग आहेत. म्हणूनच, घटनेची माहिती मिळाल्यानंतरही ते भोपाळला येऊ शकले नाहीत. त्याचे मामा आणि दोन्ही भाऊ तिथं आले. त्यांच्या उपस्थितीत हमीदिया रुग्णालयात त्याच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टेम करण्यात आलं. तेव्हा दिव्यांशचे सहकारी विद्यार्थीही शवविच्छेदन गृहात होते.
त्याचा चेहरा एका बाजूला पूर्णपणे विद्रूप झाला होता. त्याची कवटी आणि जबडा फ्रॅक्चर झाला होता. पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये त्याच्या शरीरावर 28 जखमा आढळल्या.
बॉयफ्रेंड नाही म्हणाला, बायकोने नवऱ्याला संपवलं; म्हणाली, 'तू नाही तर...'
कॉलेजमध्ये त्याच्यासोबत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात तो खेळताना पडल्याचं सांगितलं. . गुरुवारी (30 ऑक्टोबर) सकाळी क्लासमधून ब्रेक घेऊन बाल्कनीत गेला. तेव्हा तो तिसऱ्या मजल्यावरून पडला. दैनिक भास्करच्या वृत्तानुसार रतीबाड पोलीस स्टेशनचे प्रभारी रास बिहारी शर्मा म्हणाले की, विद्यार्थ्याच्या गंभीर प्रकृतीमुळे त्याचा जबाब नोंदवता आला नाही. पण सहकारी विद्यार्थ्यांनी त्यांच्या जबाबात म्हटलं आहे की, खेळताना चुकून रेलिंगवरून उडी मारल्याने तो पडला. विद्यार्थ्यांचे म्हणणं आहे की ते पकडापकडी खेळत होते. या प्रकरणाची सर्व बाजूंनी चौकशी सुरू आहे.
खोटी माहिती दिल्याचा कुटुंबाचा आरोप
दैनिक भास्करशी बोलताना दिव्यांशचा मोठा भाऊ मनोज चौकसेने आपल्याला सुरुवातीला खोटी माहिती देण्यात आल्याचं सांगितलं. तो म्हणाला, "आम्हाला सांगण्यात आलं की दिव्यांशचा अपघात झाला आहे आणि त्याचा मृत्यू झाला आहे. जेव्हा आम्ही भोपाळला पोहोचलो तेव्हा आम्हाला कळलं की तो जिवंत आहे आणि त्याची प्रकृती गंभीर आहे. दिव्यांशला रस्ते अपघातात दुखापत झाली नव्हती. तो विद्यापीठाच्या छतावरून पडला होता"
"आम्ही तिथे नव्हतो, त्यामुळे प्रत्यक्षात काय घडलं हे आम्हाला माहिती नाही. पण जर माझ्या भावासोबत काही चुकीचं झालं असेल तर सत्य बाहेर आलं पाहिजे. आम्हाला फक्त न्याय हवा आहे. पोलिसांनी निष्पक्ष तपास करावा", अशी मागणी त्याने केली.
