बॉयफ्रेंड नाही म्हणाला, बायकोने नवऱ्याला संपवलं; म्हणाली, 'तू नाही तर...'

Last Updated:

Wife killed husband with boyfriend help : पती प्रदीपचा मृत्यू झाला. पण त्यानंतर पत्नी चांदनीच्या चेहऱ्यावर कोणतंही दुःख नव्हतं. म्हणून पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आणि धक्कादायक माहिती समोर आली.

प्रतीकात्मक फोटो (AI Generated Image)
प्रतीकात्मक फोटो (AI Generated Image)
लखनऊ : विवाहबाह्य संबंध आणि त्यातून झालेल्या हत्या यांची बरीच प्रकरणं आहेत. लग्नाच्या जोडीदाराला अफेअरची माहिती झाली की ज्या जोडीदारासोबत संबंध आहेत, त्याच्या मदतीने लग्नाच्या जोडीदाराला संपवणं अशा बातम्या तुम्ही वाचल्यात. पण एक असं प्रकरण ज्यात पतीला पत्नीच्या अफेअरबाबत काहीच माहिती नाही, तिच्या संबंधात तसा कोणताही अडथळा नाही, किंबहुना तिचा बॉयफ्रेंडही तिच्या पतीला मारायला तयार नव्हता. तरी त्या महिलेने आपल्या पतीला कायमचं संपवलं. पोलीस तपासात यामागील कारण समोर आलं आहे.
उत्तर प्रदेशच्या लखनऊनमधील ही घटना 28 वर्षांची चांदणी तिचा 24 वर्षांचा नवरा प्रदीप गौतम जो पोलीस लाइन्समध्ये सफाई कामगार होता. चांगणीचे 22 वर्षीय बच्चालाल सोबत प्रेमसंबंध होते. पती प्रदीपचा मृत्यू झाला. पण त्यानंतर पत्नी चांदनीच्या चेहऱ्यावर कोणतंही दुःख नव्हतं.
advertisement
पोलिसांना संशय आला. त्यांनी तिचे कॉल डिटेल्स तपासले. चांदनीने 10 दिवसात 400 वेळा एका अनोळखी नंबरवर फोन केल्याचं दिसलं. प्रदीपचा मृत्यू झाला त्यादिवशी ती प्रदीप आणि त्या नंबरशी सतत संपर्कात होती. तपासात दुसरा नंबर तिचा प्रियकर बच्चा लालचा असल्याचं समोर आलं. 
चौकशीदरम्यान बच्चा लालने सांगितलं, प्रदीपला मारण्याची योजना दिल्लीतच आखण्यात आली होती. लखनऊला परतल्यानंतर चांदनीने त्याला पिस्तूल खरेदी करण्यासाठी 8 हजार रुपये पाठवले. त्यानंतर बच्चा लालने पिस्तूल खरेदी केली. प्लॅनिंगनुसार तो 25 ऑक्टोबरला लखनऊला पोहोचला आणि इटौंजा इथं एक हॉटेल बुक केलं.
advertisement
चांदनीने तिच्या पतीचं ठिकाण सांगण्यासाठी बच्चा लालला वारंवार फोन केला आणि त्याला माहिती देत ​​राहिली. प्रदीप दररोज ममपूर चौकात दारू पिण्यासाठी जात असे. तिथं गेल्यावर बच्चा लाल प्रदीपला भेटत असे आणि दारू देण्याच्या बहाण्याने त्याला गावाजवळील आउटर रिंग रोडवर घेऊन जात असे.
advertisement
पोलीस तपासात असं दिसून आलं की चांदनी प्रदीपच्या दारूच्या व्यसनाला खूप कंटाळली होती. म्हणून तिने बच्चालालला प्रदीपला मारायला सांगितलं.  पण त्याने नकार दिला,  बच्चा लालने नकार दिल्यावर चांदनीने धमकी दिली की जर त्याने त्याला मारलं नाही तर ती दुसऱ्या कोणाला तरी मारायला सांगेन. यानंतर बच्चालाल हत्येसाठी तयार झाला. मीडिया रिपोर्टनुसार पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. 
advertisement
view comments
मराठी बातम्या/Viral/
बॉयफ्रेंड नाही म्हणाला, बायकोने नवऱ्याला संपवलं; म्हणाली, 'तू नाही तर...'
Next Article
advertisement
BJP Candidate List BMC Election: भाजपाची फायनल लिस्ट! मुंबईच्या मैदानात ठाकरे बंधूंना कोण भिडणार? पाहा १३६ उमेदवारांची यादी...
भाजपाची फायनल लिस्ट! मुंबईच्या मैदानात ठाकरे बंधूंना कोण भिडणार? पाहा १३६ उमेदवा
  • भाजपने आपल्या उमेदवार यादीत जुन्या चेहऱ्यांसह नवख्यांनादेखील संधी दिली आहे.

  • मुंबईत भाजपा 136, तर शिंदेंची शिवसेना 90 जागा लढवणार आहे.

  • मुंबई महापालिकेची सत्ता काबिज करण्यासाठी भाजपने चांगलीच कंबर कसली आहे.

View All
advertisement