TRENDING:

सोनम-मुस्कानची इतकी दहशत! घाबरलेल्या पतीने पत्नीसोबत जे केलं त्याचा तुम्ही विचारही केला नसेल

Last Updated:

Wife murder husband : पत्नींनी प्रियकराच्या मदतीने पतीच्या हत्या केल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. पत्नींच्या या कृत्यामुळे पुरुष समाजात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
लखनऊ : हनीमूनला नेऊन पतीला संपवणारी सोनम रघुवंशी असो किंवा पतीच्या मृतदेहाचे तुकडे करून ब्लू ड्रममध्ये ठेवणारी मुस्कान. पत्नींनी प्रियकराच्या मदतीने पतीच्या हत्या केल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. पत्नींच्या या कृत्यामुळे पुरुष समाजात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पती आपल्या पत्नींना घाबरू लागले आहेत. असाच एक घाबरलेला पती. त्याने आपल्या पत्नीसोबत जे केलं, त्याचा तुम्ही विचारही केला नसेल.
News18
News18
advertisement

उत्तर प्रदेशातील अमेठीमधून एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. येथे एक पती इतका घाबरला होता की त्याने आपल्या पत्नीचे लग्न तिच्या प्रियकराशी लावून दिले. चला तर मग संपूर्ण प्रकरण काय आहे ते सांगतो.

खरंतर, ही घटना जामो पोलीस स्टेशन परिसरातील दरियाव गावातील आहे, जी स्थानिक लोकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे.

advertisement

तरुण झालेला तो, अन् तारुण्याच्या उंबरठ्यावर ती, रात्रभर रोमान्स, सकाळ होताच घडलं ते...

सताई नावाची ही व्यक्ती 13 वर्षांपूर्वी त्याचं अमेठी जिल्ह्यातील रहिवासी सीमाशी लग्न झालं होतं. लग्नापूर्वी सीमाचे शिवानंद नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. लग्नानंतरही हे संबंध कायम राहिले. सताईने आठवडाभरापूर्वीच सीमाला शिवानंदसोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं, तेव्हा सगळं सत्य त्याला समजलं.

advertisement

आता आपल्या पत्नीला परपुरुषासोबत पाहिल्यानंतर कोणत्याही पतीचं रक्त उसळेल. पण सताईने रागाच्या भरात कोणतंही हिंसक पाऊल उचलण्याऐवजी एक अनोखा मार्ग निवडला. त्याने आपल्या पत्नीचं लग्न तिच्या प्रियकरासोबत लावून देण्याचं ठरवलं. गेल्या बुधवारी सताईने तिलोई तहसीलमध्ये नोटरीद्वारे सीमाचं लग्न शिवानंदशी लावून दिलं. या लग्नानंतर शिवानंद त्याची नवीन पत्नी सीमासोबत नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी गेला.

advertisement

मिसेस किलर! कुणी पतीचे केले 15 तुकडे तर कुणी लग्नाच्या 14 दिवसांत नवऱ्याला संपवलं, सोनमसारख्याच 4 क्रूर पत्नी

पत्नीच्या लग्नानंतर सताईनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला, 'मी एक आठवड्यापूर्वी सीमाला तिच्या प्रियकरासोबत पाहिलं होतं. 13 वर्षांपूर्वी आम्ही एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली होती, पण तिने ती शपथ मोडली. मला मरायचं नाही, अशा व्यक्तीला जबरदस्तीने ठेवणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणं आहे!' मी तिच्या इच्छेचा आदर केला आणि तिचं लग्न लावून दिलं. आता ती मुक्त आहे.'

advertisement

दरम्यान, सीमाचे वडील राम प्रसाद यांनीही या लग्नाला आपली संमती दर्शविली. ते म्हणाले, 'आमची मुलगी तिच्या प्रिय व्यक्तीसोबत गेली आहे. या निर्णयावर आमचा कोणताही आक्षेप नाही.'

मराठी बातम्या/Viral/
सोनम-मुस्कानची इतकी दहशत! घाबरलेल्या पतीने पत्नीसोबत जे केलं त्याचा तुम्ही विचारही केला नसेल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल