केरळमधील एका परीक्षेत मुलांना त्यांच्या आवडत्या खेळाबद्दल लिहिण्यास सांगण्यात आलं. थलासेरी येथील चंदुमेनन मेमोरियल वालियामादविल सरकारी यूपी शाळेतील विद्यार्थी अहान अनुपने चमचा-लिंबू या खेळाबाबत लिहिलं. खेळाचे पाच नियम लिहून काढल्यानंतर अहानने सहावा नियम जोडला ज्याने सर्वांना विचार करायला भाग पाडलं.
VIDEO : वडिलांनी फक्त मुलाला दिला iPhone, मुलगी बिच्चारी पाहतच राहिली, शेवट हृदयस्पर्शी
advertisement
त्याने नियम खालीलप्रमाणे तयार केले
1) एका वेळी पाच स्पर्धक खेळू शकतात.
2) स्पर्धकांनी तोंडात चमचा धरावा आणि त्यावर लिंबू ठेवावा.
3) त्यांनी त्यांच्या ट्रॅकवरच राहिलं पाहिजे.
4) जर लिंबू पडला तर त्यांनी ते परत ठेवून पुन्हा सुरुवात करावी.
5) जो कोणी ट्रॅकवरून जाईल त्याला अपात्र ठरवले जाईल.
6) विजेते पराभूत झालेल्यांची चेष्टा करणार नाहीत.
विद्यार्थ्याने सहावा महत्त्वाचा नियम जोडला, "विजेते पराभूत झालेल्यांची चेष्टा करणार नाहीत." शिक्षण मंत्री व्ही. शिवनकुट्टी हे विद्यार्थ्याच्या शब्दांनी इतके प्रभावित झाले की त्यांनी उत्तरपत्रिका सोशल मीडियावर शेअर केली आणि त्याला जीवनाचा धडा म्हटलं. त्यांनी म्हटलं की हे शब्द चिंतन आणि कुतूहलाला प्रेरणा देतात आणि केरळच्या सार्वजनिक शाळा कशा प्रगती करत आहेत हे दर्शवतात.
नंतर मंत्र्यांनी अहानला अभिनंदन करण्यासाठी फोन केला. मुलाने शाळेत लिंबू आणि चमच्याची शर्यत पाहिल्यानंतर त्याने हा नियम लिहिला असल्याचं सांगितलं. विद्यार्थी अहानने त्याच्या शाळेत खेळाचं मैदान नसल्याबद्दल चिंता व्यक्त केली, ज्यावर मंत्र्यांनी सरकार पुढील वर्षीपर्यंत एक खेळाचं मैदान बांधण्याचा विचार करेल, असं आश्वासन दिलं.