विचित्र नियम अन् विचित्र गाव
साधारणपणे, लोक बाहेर जाताना किंवा घरात असताना कपडे घालतात. मात्र, जगात एक असं गाव आहे जिथे एक विचित्र नियम पाळला जातो. या गावातील लोक गेल्या 90 वर्षांपासून हा अनोखा नियम पाळत आहेत.खरं तर, ब्रिटनमध्ये एक असं अनोखं गाव आहे, जिथे लोक गेल्या 90 वर्षांपासून कपडे घालत नाहीत, म्हणजेच ते कपड्यांशिवाय राहतात. तुम्हाला हे ऐकून कदाचित विश्वास बसणार नाही किंवा विचित्र वाटेल, पण हे अगदी खरं आहे.
advertisement
श्रीमंती असूनही घालत नाहीत कपडे
एका मीडिया रिपोर्टनुसार, या ब्रिटिश गावातील लोक 90 वर्षांपासून कपड्यांशिवाय जीवन जगत आहेत. या गावातील लोक गरीब आहेत असं अजिबात नाही. येथील लोकांकडे दोन-दोन खोल्यांचे बंगलेही आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या गावात राहणाऱ्या लोकांकडे सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत, परंतु श्रद्धा आणि परंपरेमुळे येथील लोक कपडे घालत नाहीत. हे गाव ब्रिटनमधील हर्टफोर्डशायर येथे असून याला 'स्पीलप्लाट्झ' (Spielplatz) नावाने ओळखले जाते. या गावात लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कोणीही कपडे घालत नाही.
90 वर्षांपासून चालत आलीय प्रथा
जर्मन भाषेत 'स्पीलप्लाट्झ' याचा अर्थ 'खेळाचे मैदान' (Playground) असा होतो. हर्टफोर्डशायरमधील हे अनोखे गाव जुन्या ब्रिटिश वसाहतीचा एक भाग आहे. या गावात सुंदर घरे, स्विमिंग पूल आहेत आणि लोकांना बिअर प्यायलाही आवडते. असं म्हटलं जातं की, या विचित्र गावात लोक 90 वर्षांहून अधिक काळापासून अशाच प्रकारे राहत आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या वस्तीची स्थापना 1929 मध्ये स्पीलप्लाट्झ गावात राहणाऱ्या 82 वर्षीय इसुल्ट रिचर्डसन यांच्या वडिलांनी केली होती. ते म्हणतात की, निसर्गवादी (naturists) आणि रस्त्यावर चालणाऱ्या सामान्य लोकांमध्ये कोणताही फरक नाही. जगभरातील अनेक लोकांनी या गावाच्या अनोख्या परंपरांवर माहितीपट (documentaries) आणि लघुपट (short films) बनवले आहेत. पोस्टमनपासून ते सुपरमार्केटमधून वस्तूंची डिलिव्हरी करण्यासाठी लोक या गावात येतात.
हे ही वाचा : तुम्ही नेहमी वापरता 'OK', पण त्याचा फुल फॉर्म काय आहे? 99.9% लोकांना माहित नाही याचं उत्तर!
हे ही वाचा : 26 फूट लांबीच्या अजगरच्या पोटातून निघाला 63 वर्षांचा शेतकरी; भयानक दृश्य बघून गावकऱ्यांची उडाली झोप!