तुम्ही नेहमी वापरता 'OK', पण त्याचा फुल फॉर्म काय आहे? 99.9% लोकांना माहित नाही याचं उत्तर!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
आपण बोलताना अनेकदा 'OK' हा शब्द वापरतो. त्यावेळी 'OK' म्हणजे 'ठीक आहे' असा आपला अर्थ असतो. पण तुम्हाला त्याचा पूर्ण अर्थ (Full Form) माहीत आहे का? होय, हा सोपा वाटणारा शब्द, पण फार कमी लोकांना त्याचा फुल फॉर्म माहिती असेल. चला तर आज आपण तो जाणून घेऊया..
जेव्हा आपण एखाद्याशी बोलतो, तेव्हा 'OK' हा शब्द अनेकदा बोलला जातो आणि ऐकला जातो. एखादे काम करण्याबद्दल असो किंवा एखाद्या गोष्टीला सहमती दर्शवण्याबद्दल असो, आपण 'OK' म्हणतो. दैनंदिन जीवनातील अगणित शब्दांमध्ये आपण 'OK' किती वेळा म्हणतो याची गणना करणे कठीण आहे. पण या 'OK' चा अर्थ म्हणजेच त्याचा फुल फॉर्म काय आहे?
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
इंग्रजीमध्ये वेळ सांगण्यासाठी AM/PM हे खूप लोकप्रिय शब्द आहेत. पण बहुतेक लोकांना त्यांचा पूर्ण अर्थ माहीत नाही. लहानपणी जरी ते सामान्य ज्ञानच्या पुस्तकांमध्ये असले तरी, आता ते डोक्यातून बाहेर पडले आहे. AM चा पूर्ण अर्थ ante meridian (ॲन्टे मेरिडियन) आहे. PM चा पूर्ण अर्थ post meridian (पोस्ट मेरिडियन) आहे. हे देखील लॅटिन शब्द आहेत.
advertisement
आता 'OK' बद्दल बोलूया. बहुतेक लोकांना माहीत नाही की 'OK' या शब्दाला देखील एक पूर्ण रूप आहे. 'OK' चा पूर्ण अर्थ Oll Korrect किंवा Olla Kalla (ओला काला) असा आहे. हे ग्रीक शब्द आहेत. हा शब्द 1840 मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीदरम्यान "Old Kinderhook" (ओल्ड किंडरहूक) म्हणूनही वापरला गेला होता, जे मार्टिन व्हॅन ब्युरेन यांचे टोपणनाव होते.