शिक्षक मुलांना विज्ञानाचे प्रयोग दाखवत होते. त्यांनी वर्ग किंवा प्रयोगशाळेत हा प्रयोग केला नाही. तर यासाठी त्यांनी मुलांना मैदानात नेलं. एरवी पीटी किंवा खेळाचा पीरिअड असला की मैदानात नेतात पण या मुलांना विज्ञानाच्या प्रयोगासाठी मैदानात नेलं. त्यानंतर जे घडलं ते 2 कोटी लोकांनी पाहिलं आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओला 20 दशलक्ष व्ह्यूज आहेत.
advertisement
VIDEO : धुरंधरचा 'फिव्हर'! डॉक्टरही बनली 'रहमान डकैत', ऑपरेशन थिएटरमध्ये अक्षय खन्ना स्टाईल एंट्री
आता तिथं नेमका कोणता प्रयोग केला हे पाहण्यासाठी तुम्हीही उत्सुक असाल. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता मधे काही विद्यार्थ्यांना रांगेत उभं केलं आहे. दोन विद्यार्थी दोन बाजूंनी उभे आहेत. त्यांच्या हातात कापड आहे, जे मधे उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावर आहे, मुलं त्या कापडाखाली आहे. दोन बाजूंनी उभी असलेले विद्यार्थी मधे असलेल्या मुलांच्या डोक्यावर हे कापड घासतात आणि नंतर वर उचलतात.
तुम्ही व्हिडीओत पाहू शकता तर कापड वर उचलताच विद्यार्थ्यांचे केस हवेत उभे राहिलेले दिसतात. हे पाहून आपल्या हसू येतं, मुलंही हसू लागतात. पुढे असं केल्याने करंट कसा लागतो तेसुद्धा दाखवण्यात आलं आहे.
माहितीनुसार हा व्हिडीओ गुजरातच्या हलवाड येथील सांदीपनी इंग्लिश स्कूलमधील व्हिडीओ आहे. अशा पद्धतीने मुलांना विज्ञान शिकवणाऱ्या शिक्षकाचं नाव मयुर वैष्णव असल्याचं सांगितलं जातचं आहे. त्यांनी स्टॅटिक चार्ज समजावून सांगण्यासाठी रोजच्या वापरातील वस्तूंचा वापर केला.
हा व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. जो 27 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. सर्व वयोगटातील लोक या व्हिडिओशी जोडले गेले आहेत काहींनी लिहिलं की त्यांना असे शिक्षक हवे होते तर काहींनी त्यांच्या शाळेच्या दिवसांच्या आठवणी शेअर केल्या.
हा व्हायरल व्हिडिओ केवळ एक प्रयोग नाही, तर मनापासून सहानुभूतीने शिकवल्याने शिक्षण कसं ओझं न बनता आनंद बनू शकतं, याचं एक उदाहरण आहे. तुमच्या शाळेतीलही असा काही किस्सा असेल तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
