कोल्ड प्लेमध्ये CEO सोबत रोमान्स, तोंड लपवून पळालेली HR अखेर 5 महिन्यांनी समोर; म्हणाली, मी त्याची...
- Published by:Priya Lad
Last Updated:
CEO HR Romance Video Viral : एका प्रसिद्ध टेक कंपनीचे सीईओ आणि एचआर हेड कोल्डप्ले कॉन्सर्टमध्ये रोमान्स करताना दिसले. त्यांचा एकमेकांच्या मिठीतील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
5 महिन्यांपूर्वी एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. एका बड्या कंपनीच्या अधिकाऱ्याने एका महिलेला मिठी मारतानाचा हा व्हिडीओ. अमेरिकेतील टेक कंपनी अॅस्ट्रोनॉर्मचे सीईओ अँडी बायर्न कंपनीची एचआर हेड क्रिस्टिन कॅबोटसह कोल्डप्लेच्या कॉन्सर्टमध्ये रोमान्स करताना दिसले. तेव्हा ते दोघंही तोंड लपवून पळाले. आता अखेर 5 महिन्यांनी ती एचआर पुन्हा समोर आली आहे.
16 जुलै 2025 रोजी प्रसिद्ध टेक कंपनी अॅस्ट्रोनॉमरचे सीईओ अँडी बायर्न आणि एचआर हेड क्रिस्टिन कॅबोट बोस्टनमध्ये झालेल्या कोल्डप्ले कॉन्सर्टमध्ये रोमान्स करताना दिसले. त्यांचा एकमेकांच्या मिठीतील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
जसा किस कॅम त्यांच्याकडे फिरला तसा त्यांचा रोमान्स या कॅमेऱ्यात कैद झाला आणि सगळ्यांनी त्यांना पाहिलं. बायरन मागे आणि क्रिस्टिन पुढे. बायरन यांनी क्रिस्टिनला मागून मिठी मारली होती. क्रिस्टिनच्या छातीवर दोघांचेही हात एकमेकांच्या हातांवर होते. क्रिस्टिन किंचित मागे बायरनच्या खांद्यावर झुकलेली दिसते आहे. दोघंही गाण्याच्या तालावर झुलत होते.
advertisement
कॅमेरा पाहताच दोघांनीही लपवला चेहरा
इतक्यात किस कॅम त्यांच्यावर गेला यावेळी कोल्डप्ले बँडमधील सिंगर क्रिस मार्टिन मोठ्याने ओरडला. अरे या दोघांना पाहा, अरे काय?. त्याच क्षणी त्यांनी आपले चेहरे लपवले. तेव्हा मार्टिनने त्यांची खिल्ली उडवली, "एकतर त्यांचे प्रेमसंबंध आहेत किंवा ते खूप लाजाळू आहेत.", असं तो म्हणाले. ज्यामुळे लोक हसू लागले.
advertisement
आपल्याला सगळे पाहत आहेत हे लक्षात येताच दोघांनीही स्वतःला लपवण्याचा प्रयत्न केला. क्रिस्टिनने आपला चेहरा हातांनी झाकला त्यानंतर तिने कॅमेऱ्याकडे पाठच गेली. तर बायरन थेट खालीच बसले. यावरून दोघांच्याही अफेअरबाबत कुणालाच माहिती नव्हतं. दोघंही लपूनछपून कॉन्सर्टमध्ये आले होते हे स्पष्ट होतं.
advertisement
5 महिन्यांनी एचआरने सोडलं मौन
53 वर्षीय कॅबोट अनेक महिने गप्प राहिली, पण आता व्हायरल झालेल्या घटनेबद्दल तिने अखेर जाहीरपणे सांगितलं आहे. कॅबोट म्हणाली, तिला लाज वाटली, सेलिब्रिटींनी तिची खिल्ली उडवली आणि सार्वजनिक ठिकाणी भेटलेल्या अनोळखी लोकांकडून तिला व्यभिचारी म्हटलं गेलं. तिला 60 हून अधिक जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याचंही तिनं सांगितलं.
advertisement
तिचा बायर्नवर क्रेश असल्याचं तिनं कबूल केलं. ती तिच्या मित्रांना त्याची ओळख करून देण्यास उत्सुक होती पण त्यांनी त्या रात्रीआधी कधीही चुंबन घेतलं नव्हतं, आमच्या दोघांमध्ये कोणतेही लैंगिक सबंध नव्हते असं तिनं सांगितलं. तिला खूप पश्चात्ताप झाला आहे.
advertisement
ही फक्त दारू पिऊन केलेली चूक होती. तिने न्यू यॉर्क टाईम्सला सांगितलं, "मी एक वाईट निर्णय घेतला, थोडं जास्त टकीला आणि कॉकटेल प्यायले. मी माझ्या बॉससोबत नाचले आणि आम्ही एकमेकांना मिठी मारली. पण त्यांनी कॉन्सर्टमध्ये टकीला कॉकटेल शेअर केलं होतं आणि त्यांच्या व्हीआयपी बाल्कनी सीटवर एकत्र नाचले होते. ही पहिली आणि शेवटची वेळ होती.
advertisement
गमावली नोकरी
अवघ्या 13 सेकंदाचा हा व्हिडीओ. जो व्हायरल झाल्यानंतर बायरनने तेव्हाच त्याच्या पदाचा राजीनामा दिल्याचं वृत्त होतं. तर कॅबोटनेही आपली नोकरी सोडल्याचं सांगितलं आहे. ती म्हणाली, "ही काही छोटी गोष्ट नव्हती आणि मी त्याची जबाबदारी घेते. मी त्याची किंमत चुकवली आहे आणि माझी नोकरी सोडली आहे"
Location :
Delhi
First Published :
Dec 19, 2025 3:55 PM IST
मराठी बातम्या/Viral/
कोल्ड प्लेमध्ये CEO सोबत रोमान्स, तोंड लपवून पळालेली HR अखेर 5 महिन्यांनी समोर; म्हणाली, मी त्याची...











