अजब कायदा! कंबर आणि पोटाच्या मापावर सरकारने घातली मर्यादा; थोडं जरी वाढलं तर...
- Published by:Priya Lad
Last Updated:
Obesity Law : तुमचं पोट आणि कंबर किती असणार यावर सरकारचं नियंत्रण, त्यासाठी कायदा... हे वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल.
advertisement
advertisement
मेटाबॉलिक सिंड्रोम प्रतिबंध कायदा, ज्याला मेटाबो कायदा म्हटलं जातं. याअंतर्गत 40 ते 75 वयोगटातील प्रत्येक प्रौढ व्यक्तीसाठी कंबर मोजणं अनिवार्य आहे. या 74 वयोगटातील सर्व नागरिकांची वार्षिक आरोग्य तपासणी केली जाते. या तपासणीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे कंबर मोजणं. अहवालांनुसार पुरुषांसाठी 85 सेंटीमीटर महिलांसाठी ही मर्यादा 90 सेंटीमीटर (35.43 इंच) आहे. 33.46 इंच पेक्षा जास्त कंबर आकार जोखीम सूचक मानला जातो.
advertisement
advertisement
2018 साली हा कायदा व्हिसेरल फॅटला लक्ष्य करण्यासाठी तयार करण्यात आला होता, जो मेटाबॉलिक सिंड्रोम, हृदयरोग आणि अकाली मृत्यूशी जोडलेला आहे. त्याचा उद्देश लोकांना लाजवणं नाही तर आरोग्य समस्या दिसण्यापूर्वी त्या ओळखणं आहे. याचा उद्देश कडक नियमांसह लठ्ठपणाशी लढा देणं हा नव्हता, तर गंभीर आजार होण्यापूर्वी आरोग्य धोके लवकर ओळखणं आणि मार्गदर्शन करणं हा होता.
advertisement
यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. एका युझरने म्हटलं, "निरोगी खाणं, निरोगी वाटणं आणि निरोगी दिसणं हे केवळ सरकारचं काम नाही, तर राष्ट्र निरोगी राहावं यासाठी प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे" दुसऱ्या युझरने म्हटलं, "आपल्या सर्वांना या हस्तक्षेपाची आवश्यकता आहे. यामुळे जीवनशैलीच्या आजारांमुळे होणारे दुःख आणि त्यामुळे वैद्यकीय व्यवस्थेवरील ताण देखील कमी होईल.
advertisement








