TRENDING:

VIDEO : भरधाव स्पीडने बाईक चालवत होता तरुण, पुढच्याच क्षणी घडलं धक्कादायक

Last Updated:

तुम्ही अॅक्शन मूव्हीमध्ये अनेक स्टंट सीन पाहिले असतील. हिरो भरधाव बाईक चालवत धोकादायक स्टंट करतो. मात्र असाच स्टंट खऱ्या आयुष्यात करायचा म्हटल्यावर लोकांचा जीवही जाऊ शकतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर : तुम्ही अॅक्शन मूव्हीमध्ये अनेक स्टंट सीन पाहिले असतील. हिरो भरधाव बाईक चालवत धोकादायक स्टंट करतो. मात्र असाच स्टंट खऱ्या आयुष्यात करायचा म्हटल्यावर लोकांचा जीवही जाऊ शकतो. मात्र एका तरुणाने असा स्टंट केला असून तो भरधाव बाईक चालवत होता. मात्र पुढच्याच क्षणी त्याच्यासोबत धक्कादायक घडतं. याचा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.
बाईक आणि ट्रकचा भयंकर अपघात
बाईक आणि ट्रकचा भयंकर अपघात
advertisement

रस्त्याने भरधाव वेगानं बाईक चालवत तरुण स्टंटबाजी करत होता. मात्र पुढच्या क्षणी त्याचा भयानक अपघात होतो. बाईकची ट्रकसोबत जोरदार धडक होते आणि बाईकस्वार खाली कोसळतो. हे भयानक दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं असून व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय.

व्हायरल होण्यासाठी खाल्ली धक्कादायक गोष्ट, तरुणासोबत पुढच्याच क्षणी घडलं भयंकर

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती गाडीवर व्हिडीओ बनवत आहे. तो रस्त्याने दिसणाऱ्या निसर्गाला टिपण्याचा प्रयत्न करतोय. मात्र काही क्षणातच कॅमेऱ्यात धक्कादायक अपघात कैद होतो. एक तरुण मागून बाईकने भरधाव स्पीडने येतो आणि समोरुन येणाऱ्या ट्रकला धडकतो. या धडकेत तरुण बाईकसह काही अंतरावर जाऊन पडतो. अंगावर काटा आणणारा हा अपघात सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

advertisement

queen_of_valley नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. काहीच वेळात हा व्हिडीओ इंटरनेटवर खळबळ माजवतााना दिसला. व्हिडीओवर अनेक कमेंटही येत आहेत. लोकांनी असे धोकादायक स्टंट करत असल्यामुळे संताप व्यक्त केलाय.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात वाढ, तूर भाव घसरले, कापसाची काय स्थिती? Video
सर्व पहा

दरम्यान, असे स्टंट व्हिडीओ सोशल मीडियावर कायमच पहायला मिळतात. लोक प्रसिद्धी झोतात येण्यासाठी अशी स्टंटबाजी करतात आणि लोकांचं लक्ष वेधतात. मात्र अनेकवेळा ही स्टंटबाजी त्यांच्याच अंगलट येते आणि गंभीर दुखापत होते तर कधी लोकांना जीवही गमवावा लागतो.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
VIDEO : भरधाव स्पीडने बाईक चालवत होता तरुण, पुढच्याच क्षणी घडलं धक्कादायक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल