advertisement

व्हायरल होण्यासाठी खाल्ली धक्कादायक गोष्ट, तरुणासोबत पुढच्याच क्षणी घडलं भयंकर

Last Updated:

लोक सोशल मीडियावर विविध गोष्टी शेअर करत असतात. प्रसिद्ध झोतात येण्यासाठी, लाईक्स आणि फॉलो मिळवण्यासाठी लोक काहीही करताना दिसतात.

व्हायरल होण्यासाठी खाल्ली धक्कादायक गोष्ट
व्हायरल होण्यासाठी खाल्ली धक्कादायक गोष्ट
नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर : लोक सोशल मीडियावर विविध गोष्टी शेअर करत असतात. प्रसिद्ध झोतात येण्यासाठी, लाईक्स आणि फॉलो मिळवण्यासाठी लोक काहीही करताना दिसतात. अनेक प्रकारच्या घटना समोर येत असतात. एक अशीच घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे ज्यामध्ये एका तरुणानं प्रसिद्ध होण्याच्या नादात विचित्र गोष्ट खाल्ली. हे विचित्र प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया.
एका तरुणानं Tik Tokवर व्ह्युज मिळवण्यासाठी एक अशी गोष्ट खाल्ली जी त्याच्यासाठी हानिकारक आहे. 23 वर्षीय या तरुणाचं नाव nichola kratka आहे. फ्लोरिडा येथे राहणाऱ्या या तरुणाने जे केलं ते पाहून तुम्हीही डोक्यावर हात मारुन घ्याल.
प्रकरण काय?
निकोला क्रत्कानं तलावातून काही मासे पकडून आणले होते. त्याला हे माहित होतं की मासे संक्रमित आहेत. त्यांनी पैरासाईट्स, गांडुळ, खाल्ले आहेत. तरीही त्यानं हबे मासे फेकून न देता खाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काहीच वेळात त्याला याचे घातक परिणामही भोगावे लागले. मासे खाल्ल्यानंतर काहीच वेळात त्याला पोटदुखी, जुलाब, मळमळ होऊ लागली.
advertisement
निकोलाला रुग्णालयात दाखल गेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला अनेक प्रकारची जंताची औषधं दिली. कारण त्याला नेमका कोणत्या जंताचा संसर्ग झाला हे समजत नव्हतं. हे प्रकरण समोर येताच अनेकांनी त्याला सुनावलं. कारण फक्त प्रसिद्धीसाठी स्वतःच्या जीवाशी खेळणं हे खूप मुर्खपणाची गोष्ट आहे. मात्र रुग्णलयात गेल्यानंतरही निकोलानं म्हटलं की, त्याला हे केल्याचा कोणताही पश्चाताप नाही.
advertisement
दरम्यान, प्रसिद्धीसाठी लोक काहीही करतात, याची अनेक उदाहरणे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंवरुन तुम्ही पाहू शकता.
view comments
मराठी बातम्या/Viral/
व्हायरल होण्यासाठी खाल्ली धक्कादायक गोष्ट, तरुणासोबत पुढच्याच क्षणी घडलं भयंकर
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement