पिशवीभर आणली चिल्लर आणि भिकाऱ्याने घेतला iPhone, पाहा Video
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Apple Iphone घेण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. काहींना महागडे फोन आवडतात म्हणून तर काही चांगल्या क्वालिटीसाठी फोन खरेदी करतात.
नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर : Apple Iphone घेण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. काहींना महागडे फोन आवडतात म्हणून तर काही चांगल्या क्वालिटीसाठी फोन खरेदी करतात. आयफोनचे नवनवे वर्जन येत आहेत आणि लोकांमध्ये याची क्रेझ आणखीनच वाढत आहे. आयफोन खरेदी करतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पहायला मिळतात. तुम्ही कधी एखाद्या भिकाऱ्याला आयफोन खरेदी करताना पाहिलंय का? एक व्हिडीओ सध्या लोकांचं लक्ष वेधून घेत असून यामध्ये भिकारी आयफोन खरेदी करण्यासाठी थेट दुकानात पोहोचला.
तुम्ही कधी एखाद्या भिकाऱ्याला महागडी वस्तू घेताना पाहिलंय का? सध्या एक भिकारी आयफोन घेतानाचा व्हिडीओ समोर आलाय. हा व्हिडीओ पाहून अनेकजण चकित झाले. त्याला पाहून दुकानदारही संभ्रमात पडले. हा भिकारी चर्चेचा विषय ठरत आहे.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक भिकारी बॅग घेऊन अॅपल आयफोनच्या दुकानात पोहोचतो. तेथे उपस्थित लोक त्यांला पाहून सुरुवातीला त्याला हाकलतात नंतर आतमध्ये घेतात. यानंतर भिकारी पिशवीतून नाणी काढतो, जे पाहून लोक थक्क होतात. दुकानात असलेले कर्मचारी नाणी मोजतात. यानंतर त्याला अॅपलचा आयफोन दिला जातो.
advertisement
advertisement
experiment_king इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांना विश्वास बसत नाही आणि काही लोक याला स्क्रिप्ट देखील म्हणत आहेत. त्याचबरोबर काही लोक त्याचे कौतुकही करत आहेत. खरंतर एका युट्युबरने हा व्हिडीओ बनवला असून तो व्हायरल होतोय.
दरम्यान, हा व्हिडीओ कोणत्या ठिकाणचा आहे हे स्पष्ट झालं नाही. वाऱ्यासारखा हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होतोय. लोक प्रसिद्धीसाठी असे प्रयोग करुन व्हिडीओ बनवत असतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 13, 2023 12:16 PM IST







