TRENDING:

किडनीपासून लिव्हरपर्यंत... ब्लॅक मार्केटमध्ये प्रत्येक 'मानवी अवयवा'ची किती असते किंमत? रेटकार्ड वाचून डोकं फिरेल!

Last Updated:

मानवी अवयवांचा अवैध व्यापार जगभरात एक गंभीर समस्या बनली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार, हा काळाबाजार दरवर्षी 14 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त नफा मिळवतो. यात गरीब आणि गरजू लोकांना...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
एक काळ होता जेव्हा लोक आपल्या घामाच्या कमाईत भरभराट व्हावी म्हणून दानधर्म करायचे. लोकांमध्ये माणुसकी जिवंत होती आणि मरण्यापूर्वी आपले अवयव दान करून ते एखाद्या गरजूला जीवदान देत असत. पण आज हे चित्र पूर्णपणे पालटले आहे. माणुसकी लोप पावत चालली आहे आणि तिच्या जागी मानवी अवयवांच्या अवैध व्यापाराने एक भयानक रूप धारण केले आहे.
Human organs Illegal business
Human organs Illegal business
advertisement

मानवी अवयवयांचा तस्कारीचा खेळ फोफावला

आज जगभरात मानवी अवयवांचा काळाबाजार फोफावला आहे. आपले प्राण वाचवण्यासाठी लोक कोणत्याही किंमतीला अवयव विकत घ्यायला तयार आहेत. याच गरजेचा फायदा घेऊन तस्कर सक्रिय झाले आहेत. कधी मृतांच्या शरीरातून अवयव चोरले जातात, तर कधी रुग्णालयात जिवंत माणसांच्या शरीरातून मूत्रपिंड (किडनी) आणि इतर अवयव गुपचूप काढून घेतले जातात. मानवी तस्करीच्या माध्यमातून चालणारा हा खेळ आता जगभर पसरला आहे.

advertisement

हे आहे अवयवयांचे रेट कार्ड

या काळ्या बाजारात किडनी, लिव्हर, हार्ट आणि अगदी डोळ्यांच्या बुबुळांचाही सौदा होतो. संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालानुसार, या अवैध धंद्यातून दरवर्षी सुमारे 14,000 कोटी रुपयांचा नफा कमावला जातो. 'द मेडिकल फ्युचरिस्ट' या संस्थेच्या अहवालानुसार, एका मानवी हृदयाची किंमत 8 कोटी रुपयांपेक्षा जास्त, लिव्हरची किंमत सुमारे 4.5 कोटी, तर एका किडनीसाठी 2 कोटी रुपये मोजले जातात. इतकेच नव्हे, तर फुफ्फुसांसाठी 1 ते 2 कोटी, बोन मॅरोसाठी 15 लाख आणि एका ग्लास रक्तासाठी 20 हजार रुपये मोजले जातात. सैद्धांतिकदृष्ट्या, जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील सर्व अवयव विकले गेले, तर त्याची किंमत 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकते.

advertisement

या अवैध धंद्यात गरिबांचा जातो बळी

'द गार्डियन' वृत्तपत्राचा अहवाल तर आणखीच धक्कादायक आहे. त्यानुसार, जगात दर तासाला एका किडनीची अवैधपणे विक्री होते. या रॅकेटचे मुख्य लक्ष्य असतात कर्ज आणि उपासमारीने ग्रासलेले गरीब लोक. त्यांना पैशांचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले जाते, पण प्रत्यक्षात त्यांच्या हातात केवळ 10% ते 20% रक्कमच टेकवली जाते आणि त्यांचे आरोग्य कायमचे धोक्यात येते. कधी नोकरीच्या बहाण्याने, तर कधी फसवून किंवा जबरदस्तीने लोकांचे अवयव काढले जातात. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, जगात दरवर्षी 10,000 पेक्षा जास्त अवैध किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होतात. जिथे गरिबी आणि बेरोजगारी जास्त आहे, तिथे हा गोरखधंदा अधिक फोफावला आहे.

advertisement

अवयवांसाठी एखाद्याची हत्याही केली जाते

अमेरिकेसारख्या विकसित देशांमध्ये अवयवांची विक्री बेकायदेशीर असूनही, हा घृणास्पद व्यवसाय गुप्तपणे सुरूच आहे. इंटरनेट आणि फेसबुक-व्हॉट्सॲपसारख्या सोशल मीडियामुळे या तस्करांचे काम आणखी सोपे झाले आहे. ते बनावट ग्रुप तयार करून गरजू लोकांना जाळ्यात ओढतात. या बाजाराचा खरा चेहरा अतिशय क्रूर आहे. श्रीमंत व्यक्ती आपले प्राण वाचवण्यासाठी लाखो रुपये खर्च करते, पण दुसरीकडे, अवयव विकणाऱ्या व्यक्तीचे आयुष्य मात्र बरबाद होते. काही वेळा तर तस्कर केवळ अवयवांसाठी लोकांची हत्या करण्यासही मागेपुढे पाहत नाहीत.

advertisement

माणुसकी कशी मारत चाललीय, हेच दिसते

हा व्यवसाय केवळ पैसे कमावण्याचे साधन नसून माणुसकीला लागलेला एक मोठा कलंक आहे. ही आकडेवारी अवैध अवयव व्यापाराने माणुसकी कशी मरत चाललीय, हेच दाखवते. या गंभीर समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कठोर कायदे करणे आणि समाजात अवयवदानाबद्दल जागरूकता निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून कोणत्याही गरजूला जीव वाचवण्यासाठी अशा अवैध आणि धोकादायक मार्गांचा अवलंब करावा लागणार नाही.

हे ही वाचा : धक्कादायक! कुत्र्याने चाटली जखम, रक्तात शिरला 'हा' भयंकर जीवाणू, 83 वर्षांच्या आजीचा अखेर मृत्यू

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

हे ही वाचा : 70 वर्षांच्या आजीचं डेअरिंग लय भारी! पकडला भलामोठा साप अन् घातला गळ्यात; VIDEO पाहून म्हणाल, "ही तर लेडी टार्झन"

मराठी बातम्या/Viral/
किडनीपासून लिव्हरपर्यंत... ब्लॅक मार्केटमध्ये प्रत्येक 'मानवी अवयवा'ची किती असते किंमत? रेटकार्ड वाचून डोकं फिरेल!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल