तीन मजली घर, पण अवघे तीन फूट रुंद!
या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की, हे घर दोन मोठ्या घरांच्या मधोमध बांधले गेले आहे. समोरून पाहिल्यास त्याला खिडक्या आहेत, वाऱ्याच्या खेळत्या हवा येण्यासाठी खिडक्या ठेवण्यात आल्या आहेत. तळमजल्यावर एक छोटंसं दुकान आहे आणि वर जाण्यासाठी अरुंद पायऱ्याही आहेत. विशेष म्हणजे, हे घर तीन मजली आहे, पण केवळ तीन फूट रुंद असल्याने अनेकांना प्रश्न पडला आहे की, अशा घरात राहणे कसे शक्य आहे?
advertisement
व्हिडिओवर कोट्यवधी व्ह्यूज, लाखोंनी दिली पसंती
हा व्हिडिओ @smart_amroha या इंस्टाग्राम हँडलवर शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे – ‘जगातील सर्वात लहान घर! अवघे तीन फूट रुंद, कधी पाहिले आहे असे घर?’ या व्हिडिओला अवघ्या चार दिवसांतच 3 लाख 19 हजारांहून अधिक लाइक्स आणि 9 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया
- एका युजरने लिहिले – ‘पुढच्या व्हिडिओत आतून दाखवा, खूप कुतूहल वाटतेय!’
- दुसऱ्याने कमेंट केली – ‘हा व्हिडिओ पाहूनच मला गुदमरल्यासारखे वाटत आहे!’
- तिसऱ्याने लिहिले – ‘हे घर जबरदस्तीने बांधले आहे असे वाटते!’
- चौथ्याने गंमतीने लिहिले – ‘बाजूच्या घरांनी दाबून ते आणखी छोटे केले आहे असे दिसते!’
हे ही वाचा : होय हे शक्य आहे! 2 पुरूष एकत्र येऊन जन्माला घालू शकतात मूल, चीनच्या वैज्ञानिकांचा प्रयोग यशस्वी
हे ही वाचा : पोरीला लिप स्टड हवं होतं, फक्त 700 रुपयांत विकले 1 कोटींचे दागिने, आईनं गाठलं पोलीस ठाणं, पुढे काय झालं?