पोरीला लिप स्टड हवं होतं, फक्त 700 रुपयांत विकले 1 कोटींचे दागिने, आईनं गाठलं पोलीस ठाणं, पुढे काय झालं?
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
शांघायमध्ये एका मुलीने तिच्या आईची 1 कोटी रुपयांची ज्वेलरी चोरून फक्त 700 रुपयांना विकली. तिला लिप स्टड खरेदी करायचा होता. ही घटना सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.
लोक बऱ्याचदा नकळत अशा चुका करतात, ज्या नंतर त्यांना पश्चात्ताप करावा लागतो. असाच एक प्रकार चीनच्या शांघाय शहरात घडला आहे. येथे एका मुलीने आपल्या आईचे मौल्यवान दागिने चोरी करून केवळ 60 युआन (फक्त ७०० रुपये) मध्ये विकले. या घटनेनंतर संपूर्ण प्रकरण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे. विशेष म्हणजे या दागिन्यांची खरी किंमत तब्बल 1 मिलियन युआन (सुमारे 1 कोटी 19 लाख रुपये) इतकी होती.
लिप स्टड खरेदीसाठी घेतला मोठा निर्णय
या मुलीला लिप स्टड (ओठात घालण्याचे एक प्रकारचे पिअर्सिंग दागिने) खरेदी करायचे होते, ज्याची किंमत साधारण 700 रुपये होती. लिप स्टड हे एक छोटेसे नखासारखा दागिना असतो, ज्याला मागील बाजूस सरळ किंवा किंचित वाकलेली रॉड आणि सपाट बेस किंवा बॉल लॉक असतो.
आईला कळताच पोलिसांत धाव
advertisement
या घटनेचा उलगडा तेव्हा झाला, जेव्हा मुलीच्या आईला अर्थात वँग यांना घरातील महागडे दागिने गायब असल्याचे लक्षात आले. ही बाब समजताच त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास केल्यानंतर समोर आले की, या मुलीने दागिने केवळ काही पैशांमध्ये विकले होते. या घटनेशी संबंधित एक व्हिडिओही व्हायरल झाला असून, त्यामध्ये जेड ब्रेसलेट, हार आणि मौल्यवान रत्नांनी जडवलेले इतर दागिने चोरीला गेल्याचे दिसून आले.
advertisement
'फेक दागिने समजून विकले'
मुलगी ली हिने आईचे दागिने खरे असल्याचे समजलेच नाही. तिला ते बनावट वाटले आणि तिने ते स्थानिक बाजारातील जेड रिसायकलिंग दुकानात विकून टाकले. "मी तिला विचारले की, तिने दागिने का विकले? त्यावर तिने उत्तर दिले की, त्या दिवशी तिला पैशांची गरज होती. मी विचारले, किती पैसे हवे होते, तर तिने सांगितले - 60 युआन. मग मी विचारले की, हे पैसे कशासाठी हवे होते, तर ती म्हणाली - 'माझ्या ओठात स्टड घालायचा होता, त्यासाठी हवे होते'" असे वँग यांनी पोलिसांना सांगितले.
advertisement
सीसीटीव्हीच्या मदतीने दागिने परत मिळाले
पोलीस अधिकारी फॅन गाओजिए यांच्या माहितीनुसार, तक्रार मिळताच बाजारातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आणि व्यवस्थापनासोबत समन्वय साधण्यात आला. "त्या दिवशी दुकानाचा मालक तिथे नव्हता, पण आम्ही त्याला फोनद्वारे संपर्क साधून पोलीस ठाण्यात बोलावले," असे त्यांनी सांगितले. अखेरीस या दागिन्यांचा मागोवा लावण्यात पोलिसांना यश आले आणि ते वँग यांना परत मिळाले.
advertisement
हे ही वाचा : राग आला की माणसाचा चेहरा पिवळा-निळा का होत नाही, 'लाल'च का होतो? विज्ञानाने उलगडलं रहस्य...
हे ही वाचा : होय हे शक्य आहे! 2 पुरूष एकत्र येऊन जन्माला घालू शकतात मूल, चीनच्या वैज्ञानिकांचा प्रयोग यशस्वी
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 07, 2025 6:45 PM IST
मराठी बातम्या/Viral/
पोरीला लिप स्टड हवं होतं, फक्त 700 रुपयांत विकले 1 कोटींचे दागिने, आईनं गाठलं पोलीस ठाणं, पुढे काय झालं?