होय हे शक्य आहे! 2 पुरूष एकत्र येऊन जन्माला घालू शकतात मूल, चीनच्या वैज्ञानिकांचा प्रयोग यशस्वी
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
चीनमध्ये वैज्ञानिकांनी 2 नर उंदरांपासून एका उंदराला जन्म देण्याचा ऐतिहासिक प्रयोग केला आहे. स्टेम सेल तंत्रज्ञानाचा वापर करून हे यश मिळवले आहे. मानवासाठी हे संशोधन नवीन दिशा देऊ शकते.
आजपर्यंत मूल जन्माला घालण्यासाठी आई-वडील असणे आवश्यक होते. पण, दोन पुरुष मिळून मूल जन्माला घालू शकतात का? आईशिवाय मूल होणे शक्य आहे का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी अनेक वर्षांपासून वैज्ञानिक प्रयोग सुरू आहेत. मात्र, यामध्ये फारसे यश आले नव्हते. आता, चीनमध्ये एका ऐतिहासिक प्रयोगामध्ये वैज्ञानिकांना दोन पुरुषांपासून मूल जन्माला घालण्यात यश मिळाले आहे. हा प्रयोग का महत्त्वाचा आहे आणि याचा मानवी पुनरुत्पत्तीवर काय परिणाम होऊ शकतो, हे जाणून घेऊया...
चिनी वैज्ञानिकांचा मोठा प्रयोग
चीनमधील Chinese Academy of Sciences (CAS) मधील झी कुन ली यांच्या नेतृत्वाखालील वैज्ञानिकांनी स्टेम सेल इंजिनिअरिंगच्या मदतीने दोन नरांपासून उंदराला जन्म दिला. हे पहिल्यांदाच झाले नाही. 2023 मध्ये जपानी वैज्ञानिकांनीही असा प्रयोग केला होता, मात्र त्या उंदराचे आयुष्य मर्यादित होते. चिनी वैज्ञानिकांच्या प्रयोगामध्ये मात्र उंदराचा जन्म झाला आणि तो बाल्यावस्थेतून प्रौढत्वापर्यंत पोहोचला. यामुळे हा प्रयोग अधिक महत्त्वाचा ठरतो.
advertisement
पूर्वी अपयशी ठरलेले प्रयत्न
पुरुषी स्टेम सेल्सपासून अंडी तयार करण्याचे प्रयत्न यापूर्वी अयशस्वी ठरले होते. काही जोडपी सरोगसीच्या माध्यमातून मूल जन्माला घालू शकतात, पण हा मार्ग अनेक अडचणींनी भरलेला आहे. चिनी वैज्ञानिकांनी केलेल्या प्रयोगामध्ये जन्मलेले उंदीर स्वत:ची पुनरुत्पत्ती करू शकत नसले तरी ते इतर उंदरांपेक्षा अधिक निरोगी होते. यामुळे भविष्यातील प्रयोगांसाठी ही मोठी उपलब्धी मानली जाते.
advertisement
मानवी पुनरुत्पत्तीमध्ये हे शक्य आहे का?
सध्याच्या प्रयोगात सुमारे 90% भ्रूण जिवंत राहू शकले नाहीत आणि निम्म्या उंदरांनी प्रौढावस्थेपर्यंत पोहोचण्याआधीच जीव गमावला. त्यामुळे ही प्रक्रिया अजूनही खूप अवघड आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, मानवांवर हा प्रयोग त्वरित लागू करणे शक्य नाही. मात्र, यामुळे मानसिक आणि अनुवंशिक आजारांविषयी अधिक माहिती मिळेल. भविष्यात ही तंत्रज्ञानप्रणाली सुधारली गेल्यास, ज्यांना नैसर्गिक पद्धतीने मूल होऊ शकत नाही, त्यांच्यासाठी ही आशेची नवी किरण ठरू शकते.
advertisement
भविष्यातील शक्यता
हा प्रयोग जनुकीय अभियांत्रिकी (Genetic Engineering) क्षेत्रात एक मोठी झेप मानली जात आहे. मात्र, याला मानवी पुनरुत्पत्तीमध्ये वापरण्यासाठी अनेक अडथळे आहेत. जर या प्रयोगात अधिक सुधारणा झाल्या, तर भविष्यात प्रजनन तंत्रज्ञानासाठी नवे मार्ग खुली होऊ शकतात. ही विज्ञान क्षेत्रातील मोठी क्रांती असली तरी नैतिक, वैज्ञानिक आणि कायदेशीर अडचणी दूर करणे आवश्यक आहे. भविष्यात याचा वापर मानवांसाठी कसा होईल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
advertisement
हे ही वाचा : आई-वडिलांपासून पती-पत्नीपर्यंत या देशात संपूर्ण कुटुंबच भाड्याने मिळतं! इतकंच नाहीतर...
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 07, 2025 6:27 PM IST
मराठी बातम्या/Viral/
होय हे शक्य आहे! 2 पुरूष एकत्र येऊन जन्माला घालू शकतात मूल, चीनच्या वैज्ञानिकांचा प्रयोग यशस्वी