advertisement

आई-वडिलांपासून पती-पत्नीपर्यंत या देशात संपूर्ण कुटुंबच भाड्याने मिळतं! इतकंच नाहीतर...

Last Updated:

जपानमध्ये भाड्याने कुटुंब मिळवण्याचा व्यवसाय वाढला आहे. एकटेपणा, नातेसंबंधांची कमतरता आणि विविध सामाजिक गरजांमुळे याची मागणी वाढली आहे.

rental family
rental family
जगात एक देश आहे, जिथं सुमारे 30 वर्षांपूर्वी एक अनोखा व्यवसाय सुरू झाला. या देशात हा व्यवसाय इतक्या वेगाने वाढला की, आता तो मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाला आहे. फक्त पैसे द्या आणि आई-वडील, भाऊ-बहीण, काका-काकू, मुलगा-मुलगी, नवरा-बायको अशा कुटुंबातील कोणत्याही नातेसंबंधाचा अनुभव घ्या. गरजेनुसार भाड्याने कुटुंब घ्या आणि नवी ‘कुटुंब व्यवस्था’ अनुभवा. या व्यवसायाबद्दल संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हा व्यवसाय कोणत्या देशात लोकप्रिय झाला? तो कधी आणि कसा सुरू झाला? जाणून घ्या संपूर्ण तपशील...

कुठे आहे हा अनोखा व्यवसाय?

हा देश म्हणजे जपान. जगातील एकमेव देश जिथे ‘भाड्याने कुटुंब’ मिळते. जपानमध्ये 1920 च्या दशकात ‘रेंटल फॅमिली’ व्यवसाय सुरू झाला. टोकियोतील 'फॅमिली रोमान्स' या कंपनीने सर्वप्रथम हा व्यवसाय सुरू केला. या कंपनीचे संस्थापक इशी युइची यांनी ही कंसेप्ट बाजारात आणले. सुरुवातीला हे कुटुंब भाड्याने घेणाऱ्यांसाठी अभिनेते दिले जात होते. या सेवेचा हेतू एकाकीपणा जाणवणाऱ्या लोकांना आधार देणे हा होता.
advertisement

एका माणसाचे 25 हून अधिक कुटुंब!

इशी युइची (वय 43) हे 25 हून अधिक कुटुंबांचे पिता आणि 600 हून अधिक महिलांचे ‘पती’ आहेत. मात्र, हे कुणीही त्यांचे खरे कुटुंबीय नाहीत. त्यांच्या 'फॅमिली रोमान्स' कंपनीत 1200 पेक्षा जास्त अभिनेते काम करतात. हे कलाकार भाड्याने घेतलेल्या लोकांसाठी विविध भूमिका बजावतात. लग्नात वडिलांची भूमिका, हरवलेल्या मुलांची भेट, सोबती म्हणून नवरा किंवा इतर कोणतंही पात्र हे ते कलाकार पुरवतात.
advertisement

कशासाठी घेतात भाड्याने कुटुंब?

सुरुवातीला हा व्यवसाय एकट्या लोकांसाठी सुरू करण्यात आला होता. मात्र, नंतर याचा वापर अनेक कारणांसाठी होऊ लागला. आता भाड्याने कुटुंब घेणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे.
हा व्यवसाय पुढील कारणांसाठी केला जातो...
  • लग्नसमारंभासाठी कुटुंबीय हवे असल्यास
  • अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहण्यासाठी
  • नाटक किंवा चित्रपटासाठी कलाकार म्हणून
  • एकाकीपण दूर करण्यासाठी
  • सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी
advertisement

किमती काय आहेत?

जपानमध्ये भाड्याने कुटुंब घेण्याचे दर किती लोक घेतायेत आणि किती वेळेसाठी घेतायेत यावर अवलंबून असतात. एका व्यक्तीसाठी तासभर भाडे 5000 येनपासून 20000 येनपर्यंत (सुमारे 285 ते 1140 भारतीय रुपये) असते. आता जपानमध्ये अशा अनेक कंपन्या आहेत ज्या भाड्याने कुटुंब पुरवतात. ग्राहक आपल्या गरजेनुसार कुटुंबातील सदस्य निवडू शकतो. यासाठी एक कॅटलॉग दिला जातो, ज्यात विविध सदस्यांबाबत माहिती असते. यामधून हवे तसे सदस्य निवडता येतात.
advertisement

'रेंटल फॅमिली'चा वाढता ट्रेंड का?

जपानमध्ये अनेक लोक एकटे राहतात. नोकरीच्या निमित्ताने अनेक लोक कुटुंबांपासून दूर राहतात. अशा लोकांसाठी ही सेवा एक भावनिक आधार ठरते. काही काळासाठी का होईना, त्यांना आपलेपणा मिळतो. तथापि, ही संकल्पना जपानमध्ये वादग्रस्त देखील आहे. काही लोकांच्या मते, हा व्यवसाय चुकीचा आहे. यामुळे नातेसंबंधांचा महत्त्व कमी होतो आणि लोक अधिक एकटे पडतात.
advertisement

दुसऱ्या देशांमध्येही पसरतोय हा व्यवसाय

जपानमध्ये किती लोक भाड्याने कुटुंब घेतात याचा अचूक अंदाज नाही. मात्र, तज्ज्ञांच्या मते ही संख्या लाखोंमध्ये असू शकते. तसेच, या सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांची संख्याही वाढत आहे. जपानच्या उदाहरणावरून हा व्यवसाय आता दक्षिण कोरिया आणि चीनमध्येही सुरू झाला आहे.

रेंटल फॅमिलीमध्ये कोण कोण मिळते?

या सेवेत विविध प्रकारचे कुटुंब सदस्य मिळतात. आपल्या गरजेनुसार तुम्ही सदस्य निवडू शकता...
advertisement
  • आई-वडील : सल्ला देण्यासाठी, तुमच्यासोबत वेळ घालवण्यासाठी
  • भाऊ-बहीण : खेळण्यासाठी, सहलीला जाण्यासाठी
  • नवरा-बायको : डेटवर जाण्यासाठी, फिरण्यासाठी, रोमँटिक वेळ घालवण्यासाठी
  • मुलं : खेळण्यासाठी, फिरण्यासाठी, कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी

एकावेळी अनेक सदस्यही घेऊ शकता!

तुमच्या गरजेनुसार तुम्ही एक किंवा अनेक सदस्य भाड्याने घेऊ शकता. ही सेवा आता अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत असून जपानमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होत आहे. काही लोकांसाठी हा व्यवसाय मानसिक आधार ठरतो, तर काही लोकांना हा अनैतिक वाटतो. तुम्हाला काय वाटते? अशा प्रकारची सेवा भारतात येऊ शकते का?
view comments
मराठी बातम्या/General Knowledge/
आई-वडिलांपासून पती-पत्नीपर्यंत या देशात संपूर्ण कुटुंबच भाड्याने मिळतं! इतकंच नाहीतर...
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement