वाघाला जंगलातील अनेक प्राणी घाबरतात. कारण त्यांचा वेग आणि हल्ल्याचा वार खूपच भयानक असतो. कधी येऊन ठार करतील सांगता येत नाही. सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये वाघानं एका हरणाला शिकार बनवलं असून तो त्याला पळण्याचाही चान्स देत नाही.
VIDEO : तरुणीच्या डोक्यावर चक्क मासे पोहतायेत, अशी विचित्र हेअरस्टाइल तुम्ही कधीच पाहिली नसेल
advertisement
हल्ल्याच्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक वाघ हरणाला गळ्याला दाबून हल्ला करतोय. त्याला ठार करण्याचा प्रयत्न करतोय आणि हरणाला पळण्याचाही चान्स देत नाही. हरणानंही हार मारली आणि त्यानंही सुटका करण्याचा प्रयत्न सोडू दिला. वाघाची पकड एवढी जबर आहे की हरणाची इच्छा असूनही ते स्वतःला वाचवू शकत नाही.
ranthambhorepark नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत असून व्हिडीओवर अनेक कमेंट येताना दिसत आहेत. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ राजस्थानमधील रणथंबोर नॅशनल पार्कमधील असल्याचे सांगितलं जात आहे.
दरम्यान, प्राण्यांच्या हल्ल्याचे, शिकारीचे असे व्हिडीओ इंटरनेटवर लवकर व्हायरल होतात. नेटकऱ्यांची अशा व्हिडीओंना अधिक पसंती असते.
