VIDEO : तरुणीच्या डोक्यावर चक्क मासे पोहतायेत, अशी विचित्र हेअरस्टाइल तुम्ही कधीच पाहिली नसेल
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
आजकाल बदलत्या ट्रेंडनुसार लोक काहीही करताना आढळून येतात. सोशल मीडियावर अनेक निरनिराळ्या प्रकारचे फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असतात.
नवी दिल्ली : आजकाल बदलत्या ट्रेंडनुसार लोक काहीही करताना आढळून येतात. सोशल मीडियावर अनेक निरनिराळ्या प्रकारचे फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशातच आणखी एका व्हिडीओची यामध्ये भर पडलीये. एका महिलेनं चक्क अशी हेअरस्टाइल केलीय ज्यामध्ये मासे पोहू शकतील. तिनं खरे मासे आपल्या केसांमध्ये टाकले आहे. यााचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
तुम्ही आत्तापर्यंत अनेक वेगळ्या आणि हटके हेअरस्टाइल पाहिल्या असतील किंवा ट्रायही केल्या असतील. मात्र सध्या व्हायरल होत असलेली ही अनोखी हेअरस्टाइल पाहून तुम्हीही चकित व्हाल. तरुणीनं अशी हेअरस्टाइल बनवली की त्यामध्ये मासेही पोहता येतील.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तरुणी हेअर ड्रेसिंग सलूनमध्ये बसलेली आहे. जिथे काही हेअर स्टायलिस्ट तिच्या केसांना जेल लावताना दिसत आहेत. तिच्या केसांच्या मध्यभागी एक छिद्र केलं आहे. मग एक स्टायलिस्ट त्यात पाणी घालतो आणि मग यानंतर लहान लहान मासे सोडतो. अशी विचित्र आणि अनोखी हेअरस्टाइल क्वचितच कोणी केली असेल.
advertisement
aheadhairmedia नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. काहीच वेळात व्हिडीओ इंटरनेटवर जोरदार व्हायरल झाला. तरुणीची ही हेअरस्टाइल पाहून व्हिडीओवर अनेक कमेंट येत आहेत.
advertisement
दरम्याम, सोशल मीडियावर असे हटके व्हिडीओ कायमच लक्ष वेधून घेत असतात. त्यामुळे कधी काय व्हायरल होईल आणि कोण चर्चेत येईल काही सांगता येत नाही. काही लोक मुद्दाम प्रसिद्धी झोतात येण्यासाठी काहीतरी विचित्र गोष्टी करतात आणि व्हायरल होतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 02, 2024 10:10 AM IST
मराठी बातम्या/Viral/
VIDEO : तरुणीच्या डोक्यावर चक्क मासे पोहतायेत, अशी विचित्र हेअरस्टाइल तुम्ही कधीच पाहिली नसेल










