advertisement

हे लोक आयुष्यभर करत नाही अंघोळ, तरीही शरीर स्वच्छ; काय आहे कारण?

Last Updated:

 जगभरात आंघोळीबद्दलच्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत आणि प्रत्येकाची आंघोळीची आपापली पद्धत असते; पण एक अशीही जमात आहे, ज्यामधले लोक संपूर्ण आयुष्यभर आंघोळच करत नाहीत.

हे लोक आयुष्यभर करत नाही अंघोळ
हे लोक आयुष्यभर करत नाही अंघोळ
नवी दिल्ली : जगभरात आंघोळीबद्दलच्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत आणि प्रत्येकाची आंघोळीची आपापली पद्धत असते; पण एक अशीही जमात आहे, ज्यामधले लोक संपूर्ण आयुष्यभर आंघोळच करत नाहीत. तरीही ते त्यांचं शरीर अतिशय स्वच्छ ठेवतात. आणि त्यासाठी एका विशिष्ट पद्धतीनं स्नान करतात. कोणती आहे ही जमात आणि कुठे आढळतात ही माणसं, पारोसं राहूनही हे सगळे स्वच्छ कसे काय, याविषयी जाणून घेऊ या.
आंघोळीबद्दल जगभरात वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत. काही माणसं सकाळी लवकर आंघोळ करतात तर काही ठिकाणी संध्याकाळी आंघोळ करणं चांगलं मानलं जातं. काही जण गरम पाणी वापरतात तर काही गार पाण्यानं आंघोळ करतात. काही अगदी बर्फाच्या पाण्यानेही आंघोळ करतात. पण या जगाच्या पाठीवर आयुष्यभर आंघोळ न करणारीही एक जमात आहे. तरीही ही माणसं त्यांच्या शरीराची स्वच्छता कशी राखू शकतात, हा प्रश्न सगळ्यांच्याच मनात निर्माण होतो.
advertisement
जगभरात बहुतांश जमाती आणि आदिवासी समुदायांच्या त्यांच्या अशा काही रीतिभाती आणि परंपरा असतात. आदिवासी प्रजातींमधले अनेक लोक आजही जंगलात राहतात. हे लोक आजही हजारो वर्षांपूर्वीच्या परंपरांचं अनुकरण करतात. या जमाती ज्या ठिकाणी राहतात, तिथे पूर्णपणे त्यांचंच वर्चस्व असतं. देशांची सरकारंसुद्धा या जमाती सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांच्यात लुडबुड करत नाहीत.
advertisement
आफ्रिका खंडात अशी एक आदिवासी जमात आहे, ज्यांची परंपरा ऐकल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. नामीबियामध्ये हिंबा नावाची एक जमात आहे, ज्यातली माणसं आयुष्यभर आंघोळ करत नाहीत. त्यांच्यावर आंघोळ करण्यावर कठोर बंदी घालण्यात आली आहे. या जमातीतल्या स्त्रिया आपल्या उभ्या आयुष्यात फक्त लग्नाच्या दिवशीच आंघोळ करतात. या जमातीतले लोक कपडे धुण्यासाठीसुद्धा पाण्याचा वापर करत नाहीत. यांची लोकसंख्या साधारण 50,000 आहे. या जमातीतले लोक त्यांचा जास्तीत जास्त वेळ शेतात घालवतात.
advertisement
आंघोळ न करता हे लोक स्वतःचं शरीर स्वच्छ कसं ठेवतात, हा कोणालाही प्रश्न पडेल. स्वतःला रोग आणि जीवजंतूंपासून मुक्त ठेवण्यासाठी हे लोक धुरानं आंघोळ करतात. महिला स्वतःच्या स्वच्छतेसाठी खास पद्धत वापरतात. त्या औषधी वनस्पती पाण्यात उकळतात आणि त्याच्या वाफेनं शरीराची स्वच्छता करतात. त्यांच्या शरीराला कोणतीही दुर्गंधी येत नाही. शिवाय उन्हापासून त्वचेचं रक्षण करण्यासाठी खास मलमसुद्धा लावतात. हे मलम प्राण्यांची चरबी आणि हेमाटाइट या खनिजापासून तयार केलेलं असतं.
advertisement
हिंबा जमातीतल्या लोकांच्या सवयी आजही पूर्वापार तशाच आहेत. जगाच्या विकासाचा यांच्यावर काहीच परिणाम झालेला नाही. हिंबा जमातीत मुलांच्या जन्माबद्दलही रंजक परंपरा आहेत. जमातीतली एखादी स्त्री जेव्हापासून होणाऱ्या बाळाचा विचार करू लागते तेव्हाच बाळाचा जन्म झाला असं गृहीत धरलं जातं.
गर्भधारणेपूर्वी स्त्रीला बालगीतं ऐकण्याचा सल्ला दिला जातो. त्यानंतर एखाद्या झाडाखाली बसून ती काही बालगीतं ऐकते. तसंच तिला स्वतःला काही बालगीतं रचावी लागतात. त्यानंतर ती तिच्या जोडीदाराला ही गीतं गाऊन दाखवते. त्यानंतर लैंगिक संबंधादरम्यानही दोघं मिळून ही गाणी गातात. जेव्हा तिला गर्भधारणा होते, तेव्हा ती स्त्री अन्य महिलांना तेच गाणं शिकवते. मग बाळाच्या जन्माच्या वेळी सुद्धा अन्य महिला ते गीत गातात. बाळाच्या जन्मापासून त्याच्या मृत्यूपर्यंत वेळोवेळी त्याला तेच गाणं ऐकवलं जातं.
view comments
मराठी बातम्या/Viral/
हे लोक आयुष्यभर करत नाही अंघोळ, तरीही शरीर स्वच्छ; काय आहे कारण?
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement