Walmik Karad: वाल्मिक कराड भोवती चौकशीचा फास, दोघांची नार्को अन् एकाची ब्रेन मॅपिंग, 'त्या' प्रकरणाला कलाटणी मिळणार?
- Reported by:SURESH JADHAV
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Walmik Karad : राज्याला हादरवून टाकणाऱ्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्या भोवतीच्या चौकशीचा फास आणखी घट्ट झाला आहे.
सुरेश जाधव, प्रतिनिधी, बीड: राज्याला हादरवून टाकणाऱ्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्या भोवतीच्या चौकशीचा फास आणखी घट्ट झाला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडच्या निकटवर्तीयांची आता नार्को आणि ब्रेन मॅपिंग चौकशी होणार आहे.
बीडच्या परळी येथील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आयपीएस पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीने आता वैज्ञानिक चाचण्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. आज मुंबईच्या न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत वाल्मीक कराड यांच्या घरी कामाला असलेल्या दोघे आणि तिसरा त्यांचा मित्र असल्याची माहिती समोर येत आहे.
एसआयटी आता या नावांचा संबंध कराड यांच्याशी जोडून त्यादृष्टीने तपासाची चक्रे फिरवत आहे. मात्र, कराड कुटुंबाने या लोकांशी कोणताही संबंध नसल्याचा दावा यापूर्वीच केला आहे. आज दोघांची नार्को टेस्ट तर एकाची ब्रेन मॅपिंग चाचणी होणार आहे. या प्रकरणातील संशयित गोट्या गीतेची चौकशी अद्याप बाकी आहे. त्याच्यावर मकोका लागलेला असून, तो अजूनही फरार आहे.
advertisement
तपासात तांत्रिक पुरावे मिळत नसल्याने एसआयटीने वैज्ञानिक चाचण्यांचा आधार घेतला आहे. यापूर्वी तिघांची नार्को चाचणी पूर्ण झाली आहे. आज उर्वरित तिघांपैकी दोघांची नार्को आणि एकाची 'ब्रेन मॅपिंग' केली जाणार आहे. याशिवाय, १२ जणांच्या मानसशास्त्रीय तपासण्या पार पडल्या असून, हे सर्वजण या प्रकरणातील महत्त्वाचे साक्षीदार आहेत.
या चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतरच हत्येचे नेमके कारण आणि मारेकऱ्यांचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
advertisement
एसआयटीने गेल्या सहा महिन्यांत सुमारे २०० लोकांची कसून चौकशी केली आहे. १५० हून अधिक संशयित आणि ५०० हून अधिक लोकांचे कॉल डिटेल्स तपासण्यात आले. महादेव मुंडे हे पिग्मी एजंट असल्याने प्रामुख्याने पैशांच्या व्यवहारातून ही हत्या झाली का, यादृष्टीने सखोल तपास सुरू आहे. यासह प्लॉटिंगचे व्यवहार, वैयक्तिक वाद आणि कौटुंबिक बाबी अशा सर्व बाजूंनी तपासाची चक्रे फिरली आहेत.
advertisement
६ जणांची होणार नार्को चाचणी...
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी एसआयटीने सात जणांच्या नार्को टेस्टचा प्रस्ताव पाठवला होता, मात्र त्यापैकी एका संशयिताला लिव्हरचा त्रास असल्याने वैद्यकीय कारणास्तव त्याची तपासणी नाकारण्यात आली. परिणामी, आता सहा जणांच्या चाचणीला परवानगी मिळाली आहे. यातील ज्या पहिल्या तिघांची चाचणी पार पडली, ते सर्वजण महादेव मुंडे यांच्याशी आर्थिक व्यवहाराने जोडलेले होते.
advertisement
तर आज होणाऱ्या चाचण्यांमधील दोघे जण वाल्मीक कराड यांच्या घरी कामाला होते आणि तिसरा त्यांचा मित्र असल्याची माहिती समोर येत आहे. एसआयटी आता या नावांचा संबंध कराड यांच्याशी जोडून त्या दृष्टीने तपासाची चक्रे फिरवत आहे, मात्र कराड कुटुंबाने या लोकांशी कोणताही संबंध नसल्याचा दावा यापूर्वीच केला आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Feb 17, 2026 9:19 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Walmik Karad: वाल्मिक कराड भोवती चौकशीचा फास, दोघांची नार्को अन् एकाची ब्रेन मॅपिंग, 'त्या' प्रकरणाला कलाटणी मिळणार?








