एरवी सर्व प्राण्यांची शिकार करणारा वाघ, एका प्राण्याला पाहून मात्र त्याचा थरकाप उडाला. हा प्राणी समोर येताच वाघाची भीगी बिल्ली झाली. त्या पाहून तो धूम ठोकून पळाला. वाघाला तुम्ही शिकार करताना बऱ्याचदा पाहिलं असेल पण आपली शिकार होईल या भीतीने घाबरून जाताना कधीच पाहिलं नसेल. त्यामुळे हे दृश्य पाहून लोक आश्चर्यचकीत झाले.
advertisement
कधीच पाहिलं नसेल असं दृश्य! चक्क सिंहाने माणसाला वाचवलं; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO
कुणाला घाबरला वाघ?
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, वाघ जंगलात फिरत असतो. अचानक एक प्राणी त्याच्यासमोर येतो आणि वाघ घाबरतो. त्याच्या चेहऱ्यावरील भीतीचे भावही स्पष्ट दिसतात. तो पुढे जाण्याऐवजी आपली पावलं मागे घेतो. तो प्राणीही वाघाच्या दिशेनं पुढे सरकतो. तसा वाघ मागे पावलं टाकून यूटर्न घेत तिथून पळून जातो. तो प्राणीही वाघाच्या मागे मागे धावतो. पण त्या प्राण्यापेक्षा वाघाचा पळण्याचा वेग जास्त असल्याने वाघ त्याच्या तावडीत सापडत नाही आणि त्याच्यापासून बचावतो.
VIDEO : ही चिमुकली सिंहासारखी फोडते डरकाळी; हिचा आवाज ऐकून जंगलाचा राजाही थरथर कापेल
तुम्हाला विश्वास बसणार नाही वाघ ज्या प्राण्याला घाबरला तो प्राणी दुसरा तिसरा कुणी नाही तर चक्क अस्वल आहे. अस्वल ज्याला आळशी म्हटलं जातं, सर्व प्राण्यांमध्ये माणसांना तो क्युट प्राणी वाटतो पण त्यालाच वाघ घाबरला आहे, हे आश्चर्यकारक आहे.
इथं पाहा व्हिडीओ
अस्वल आणि वाघाचा हा व्हिडिओ @AMAZlNGNATURE सोशळ मीडिया अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. अवघ्या 10 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे.
व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत. अस्वलात वाघानं काय पाहिलं की तो घाबरला, असा प्रश्न एका युझरने विचारला आहे. तर काहींनी वाघ सध्या लढाईच्या मूडमध्ये नाही असं म्हटलं आहे. तसचं अस्वलाच्या हिमतीलाही अनेकांनी दाद दिली आहे.