VIDEO : ही चिमुकली सिंहासारखी फोडते डरकाळी; हिचा आवाज ऐकून जंगलाचा राजाही थरथर कापेल
- Published by:Priya Lad
Last Updated:
तसे आपण तोंडाने बऱ्याच प्राण्यांचे आवाज काढतो पण सर्वच प्राण्यांचे आवाज हुबेहूब जमत नाहीत. विशेषतः सिंहासारखी डरकाळी तर आपल्याला फोडताच येत नाही पण हीच अशक्य गोष्ट करून दाखवली ती एका चिमुकलीनं.
नवी दिल्ली : मांजर कसते ओरडतं, म्याँव...म्याँव... कुत्रा कसा भुंकतो, भू भू... चिमणीचा आवाज कसा चिवचिव... प्राणी असो वा पक्षी प्राण्यांचे आवाज आपण तोंडाने काढतो. अगदी सिंह, वाघ यांचाही आवाज आपण काढतो. पण जसा इतर प्राण्यांचा आवाज जमतो तसं अगदी हुबेहून सिंह, वाघ यांची डरकाळी जमत नाही. पण एका चिमुकलीने मात्र सिंहासरखीच डरकाळी फोडली आहे.
सिंहासारखी डरकाळी फोडणाऱ्या मुलीचा व्हिडीओ व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. जर का तुम्ही हा व्हिडीओ पाहताना डोळे बंद केले आणि फक्त आवाज ऐकला तर तुम्हाला तो सिंहाचाच आवाज वाटेल. कुणी माणसाने हा आवाज काढला आहे, यावर विश्वासच हसणार नाही. इतका हुबेहून आवाज या मुलीनं काढला आहे.
advertisement
इथं पाहा व्हिडीओ
रिले असं या मुलीचं नाव आहे. तिची आई एमीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. टिकटॉकवर पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडीओ एक्सवरही शेअर करण्यात आला आहे.
व्हिडीओत मुलीची आई तिला सिंहासारखा आवाज काढायला लावते. मुलगी सिंहासारखी गर्जना करते. यानंतर मुलीची आई तिला हे ती कसं काय करते, तिला हे कसं जमतं असं विचारते. यावर मुलगी तिला सर्व समजावून सांगते. काय कधी कसं करायचं हे ती सांगते.
advertisement
हा व्हिडीओ पाहून लोकांना आश्चर्य वाटतं आहे. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला आणि तुम्हाला अशी डरकाळी फोडता येते का, ते प्रयत्न करून पाहा आणि आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉकसमध्ये नक्की सांगा.
Location :
Delhi
First Published :
April 27, 2024 12:04 PM IST
मराठी बातम्या/Viral/
VIDEO : ही चिमुकली सिंहासारखी फोडते डरकाळी; हिचा आवाज ऐकून जंगलाचा राजाही थरथर कापेल