कधीच पाहिलं नसेल असं दृश्य! चक्क सिंहाने माणसाला वाचवलं; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO
- Published by:Priya Lad
Last Updated:
नवी दिल्ली : सिंह... जंगलाचा राजा... ज्याला सर्व प्राणी घाबरतात. सिंहाने प्राण्यांची शिकार केल्याचे, माणसांवर हल्ला केल्याचे व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. पण सिंहाने कधी कोणत्या माणसाचा जीव वाचवल्याचं तुम्ही पाहिलं आहे का? तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही पण हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
वाघ, सिंह, बिबट्या असे प्राणी पाहावेसे वाटतात पण तितकीच त्यांची भीतीही वाटते. हे प्राणी पाहण्यासाठी आपण जंगल सफारी किंवा प्राणीसंग्रहालयात जंगलातील प्राणी पाहायला जातो. यावेळी सिंह समोर पाहिला की घाम फुटतो. पण त्यांना कॅमेऱ्यात कैद करण्यापासूनही आपण स्वतःला रोखू शकत नाही. अशीच एक व्यक्ती जी प्राणीसंग्रहालयात सिंह पाहण्यासाठी गेली आणि तिनं सिंहाला आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी मोबाईलसह हात त्याच्या पिंजऱ्यात टाकला.
advertisement
आता एखाद्या माणसाने सिंहाच्या पिंजऱ्यात हात टाकल्यावर त्याचं काय होणार? साहजिकच सिंह त्याच्यावर हल्ला करणार. माणसाने पिंजऱ्यात टाकल्यानंतर सिंह तो आपल्या जबड्यातच धरणार. असे कितीतरी व्हिडीओ तुम्ही पाहिलेसुद्धा असतील. पण इथं मात्र उलटच घडलं.
सिंहाने माणसाला वाचवलं
या व्हिडीओत मात्र सिंहाने चक्क माणसाला वाचवलं आहे. जसा तरुणाने सिंहाच्या पिंजऱ्यात हात टाकला तसा सिंह त्याच्याजवळ आला आणि त्याने आपल्या पंज्याने त्याचा हात पिंजऱ्याबाहेर काढायला लावला. सिंहाचं असं रूप तुम्ही आजवर कधीच पाहिलं नसेल. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून प्रत्येक जण आश्चर्यचकीत झाला आहे.
advertisement
इथं पाहा व्हिडीओ
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता सिंह पिंजऱ्यात आहे आणि पिंजऱ्याबाहेर दोन तरुण आहे. सिंह सुरुवातीला एका तरुणाच्या समोर आहे. तर दुसरा तरुण हातात मोबाईल घेऊन तो हात पिंजऱ्यात टाकून त्या सिंहाला आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करत आहे. सिंह त्याच्याकडे पाहतो आणि त्याच्या जवळ येतो. आता हा सिंह तरुणावर हल्ला करणार, असंच आपल्याला वाटतं. पण सिंह त्याचा हात आपल्या जबड्यात धरत नाही तर आपल्या पंज्याने पिंजऱ्याबाहेर काढतो.
advertisement
सिंहाचा हा व्हिडीओ पाहून सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. लोकांच्या तशाच आश्चर्यचकीत करणाऱ्या कमेंट येत आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
Location :
Delhi
First Published :
April 25, 2024 8:10 AM IST
मराठी बातम्या/Viral/
कधीच पाहिलं नसेल असं दृश्य! चक्क सिंहाने माणसाला वाचवलं; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO