जेव्हा वाघिणीने वाघावर हल्ला केला
या 30 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये, एक वाघ रस्त्यावर बसलेला दिसत आहे. मग समोरून एक मोठी वाघीण येते. ती वाघावर हल्ला करते, वाघही मागच्या पायावर उभा राहून हल्ला करतो. यादरम्यान दोघांची गर्जना जंगलात घुमते. मात्र, शेवटी, कमजोर दिसणारा वाघ शक्तिशाली वाघिणीसमोर गुडघे टेकतो. हा क्षण इतका दुर्मिळ आणि रोमांचक आहे की हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, जो इंटरनेट वापरकर्ते एकदा नाही तर अनेकदा पाहत आहेत.
advertisement
व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हीही हादराल
जंगलाचा हा व्हिडिओ @AMAZlNGNATURE या X हँडलवरून पोस्ट करण्यात आला आहे. या क्लिपला आतापर्यंत 29 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि 18 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. शेकडो युजर्स आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका व्यक्तीने लिहिले - वाघीण वाघापेक्षा मोठी आहे. दुसऱ्याने सांगितले की, त्यांच्या आवाजानेच शहारे आले. इतर अनेक युजर्सनी दोन शक्तिशाली शिकार्यांमधील लढाई पाहून आश्चर्य व्यक्त केले आहे.
हे ही वाचा : OMG! खरंच की काय? आकाशातून जमिनीवर कोसळला ढग, जगाचा अंत जवळ?
हे ही वाचा : बाईकच्या टायरमध्ये अडकला अजगर, या चिमुकलीने धरलं शेपटीला आणि ओढलं बाहेर, VIDEO पाहून नेटकरी हादरले!