OMG! खरंच की काय? आकाशातून जमिनीवर कोसळला ढग, जगाचा अंत जवळ?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Cloud video viral : खरंच आभाळ पडलं तर किंवा ढग धरतीवर आले तर... हे दृश्य म्हणजे कोणत्या चमत्कारापेक्षा कमी नाही हो की नाही. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
नवी दिल्ली : भित्रा ससा ही गोष्ट तुम्हाला माहितीच असेल. आभाळ पडलं पळा पळा म्हणून सगळ्यांना सांगत हा ससा पळत सुटतो. खरंच आभाळ पडलं तर किंवा ढग धरतीवर आले तर... हे दृश्य म्हणजे कोणत्या चमत्कारापेक्षा कमी नाही हो की नाही. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ढगासारखं काहीतरी जमिनीवर आल्याचा हा व्हिडीओ.
ढगासारखी दिसणारी एक गोष्ट हवेने उडत आकाशातून खाली जमिनीवर आली आहे. त्यामुळे सगळेच आश्चर्यचकीत झाले आहेत. अनेकांनी हे ढग असल्याचं म्हटलं आहे. ढग कोसळून जमिनीवर आल्याचं म्हटलं आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने ही पांढरी ढगासारखी, कापसासारखी दिसणारी गोष्ट जमिनीवर आली आहे. लोक त्याला हातही लावताना दिसत आहे. तर काही भीतीने त्याच्यापासून दूर पळत आहेत.
advertisement
हे दृश्य पाहून बरेच लोक घाबरले आहेत. ही जगाच्या अंताची सुरुवात असल्याची भीती व्यक्त केली आहे. कलियुगाचा अंत होताना असं घडणार असल्याचं बोललं जात होतं आणि ते घडल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी याचा संबंध एलियन्सशी जोडला आहे. काही युझर्सनी हे एलियन्सचे कपडे किंवा एलिन्सच्या शॅम्पूचा फेस असल्याची मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. काही युझर्सनी हा एडिट केलेला व्हिडीओ असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी हा नदीनाल्यात तयार होणारा किंवा साबणाचा फेस आहे जो उडून आला आहे, असं सांगितलं आहे.
advertisement
advertisement
हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. या व्हिडीओची सत्यता न्यूज18ने पडताळली नाही. @jyotikikalam इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्याबाबत केल्या जाणाऱ्या दावा किती खरा आणि खोटा माहिती नाही. या दाव्यांचं समर्थन न्यूज18मराठई करत नाही. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
advertisement
ढगांचं वजन किती असतं?
शास्त्रज्ञांच्या मते, एका क्युम्युलस ढगाचं सरासरी वजन 1.1 मिलियन पौंड असतं. म्हणजे मान्सून आल्यावर कोणत्याही क्षणी तुमच्या डोक्यावर लाखो पौंड पाणी तरंगत असतं. हे पाणी 100 हत्तींएवढ्या वजनाचं असतं. ढग पाण्याच्या किंवा बर्फाच्या हजारो लहान कणांनी बनलेले असतात. हे लहान कण इतके हलके असतात की ते हवेत सहज उडतात.
advertisement
क्युम्युलस ढगाचं सरासरी वजन अंदाजे 1.1 मिलियन पौंड किंवा 500,000 किलोग्रॅम असू शकतं. सामान्य क्युम्युलस ढगाची लांबी, रुंदी आणि उंची सुमारे 1 किलोमीटर (1000 मीटर) असते. त्यामुळे त्याचा आकार घन असतो. 1 घन किमी ढगाचं घनफळ 1 अब्ज घनमीटर (1000 मी x 1000 मी x 1000 मी = 1,000,000,000 m³) असतं. क्युम्युलस ढगांमध्ये पाण्याच्या थेंबांची घनता अंदाजे 0.5 ग्रॅम प्रति घनमीटर असते.
advertisement
ढगाचा व्हॉल्युम (1 बिलियन चौरस मीटर), पाण्याची घनता (0.5 ग्रॅम/घन मीटर) यांचा गुणाकार केल्यास ढगातल्या पाण्याचं एकूण वजन मिळतं. ते 500 मिलियन ग्रॅम किंवा 500,000 किलोग्रॅम असतं.
Location :
Delhi
First Published :
March 11, 2025 1:30 PM IST