TRENDING:

Viral News : चक्क टॉयलेटच चोरून नेलं, विचित्र चोरीच्या घटनेनं खळबळ

Last Updated:

चोरीच्या निरनिराळ्या घटना समोर येत असतात. आता चोरही हुशार झाले असून वेगवेगळ्या आयडिया लावून चोरी करतात. त्यामुळे त्यांची हिंमत दिवसेंदिवस वाढत चालली असून दिवसाढवळ्याही चोरी होत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली, 01 नोव्हेंबर : चोरीच्या निरनिराळ्या घटना समोर येत असतात. आता चोरही हुशार झाले असून वेगवेगळ्या आयडिया लावून चोरी करतात. त्यामुळे त्यांची हिंमत दिवसेंदिवस वाढत चालली असून दिवसाढवळ्याही चोरी होत आहे. सतत वेगळ्या ठिकाणाहून चोरीच्या घटना समोर येत असतात. यामध्ये अनेक गंभीर, मजेशीर, विचित्र प्रकारच्या घटना पहायला मिळतात. अशीच काहीशी एक चोरीची घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. चोरांनी चक्क टॉयलेटच चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया.
चक्क टॉयलेटच चोरून नेलं
चक्क टॉयलेटच चोरून नेलं
advertisement

चोरीची एक विचित्र घटना सध्या समोर आली असून सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आली आहे. चोरट्यांनी टॉयलेट चोरून नेल्याचं समोर येताच अनेकांनी तर डोक्यावरच हात मारुन घेतला आणि म्हणाले, टॉयलेट कोण चोरतं यार?

10 वर्ष पूर्ण झाल्यावर Apple कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना देते 'हे' खास गिफ्ट

चोरीची ही घटना ब्रिटनमधून समोर आलीय. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, ब्रिटनमध्ये चोरांची एक टोळी माफिया स्टाईलमध्ये विचित्र चोरी करत आहे. ही टोळी ठिकठिकाणी बसवण्यात आलेल्या पोर्टेबल टॉयलेटची लूट करते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे चोर फक्त टॉयलेटच का लुटत आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी पोर्टेबल टॉयलेटची कमतरता आहे. याचा फायदा घेत चोरट्यांनी पोर्टेबल टॉयलेटची चोरी केली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात वाढ, तूर भाव घसरले, कापसाची काय स्थिती? Video
सर्व पहा

अहवालात असं दिसून आलं आहे की, एका महिन्याच्या आत, बाहेरच्या ठिकाणी बसवलेली सुमारे 40 पोर्टेबल शौचालये गायब झाली आहेत. त्यांची किंमत 40 लाखांहून अधिक असल्याचं सांगण्यात येतंय. मोटार स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये ही फिरती स्वच्छतागृहे बसवण्यात आली होती.

मराठी बातम्या/Viral/
Viral News : चक्क टॉयलेटच चोरून नेलं, विचित्र चोरीच्या घटनेनं खळबळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल