10 वर्ष पूर्ण झाल्यावर Apple कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना देते 'हे' खास गिफ्ट
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
लोक वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करतात. एकाच कंपनीत अनेक वर्ष काम करणारे कर्मचारी क्वचितच सापडतील.
नवी दिल्ली, 01 नोव्हेंबर : लोक वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करतात. एकाच कंपनीत अनेक वर्ष काम करणारे कर्मचारी क्वचितच सापडतील. एकाच कंपनीत वर्षानुवर्षे काम करणं सोपं नसतं, त्यामुळे जास्त वर्ष काम करणाऱ्या कर्माऱ्यांना कंपनी खास गिफ्ट देत असते. कंपनीसाठी एवढे वर्ष दिल्याबद्दल, एकनिष्ठ राहिल्याबद्दल, मेहनत घेतल्याबद्दल कंपनी त्यांचा सन्मान करते. सर्वांत प्रसिद्ध आणि कायमत चर्चेत असलेली कंपनी Apple देखील आपल्या जुन्या आणि जास्त काळ टिकणाऱ्या कर्मचाऱ्यांना खास गिफ्ट देत असते. अलीकडेच एका कर्मचाऱ्याने Apple मध्ये 10 वर्ष पूर्ण केल्यावर काय खास गिफ्ट मिळालं याविषयी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली.
Apple कंपनीतील मार्कोस अलोन्सो नावाच्या कर्मचाऱ्याने कंपनीत आपली 10 वर्षे पूर्ण केली. त्याने टेक जायंटकडून मिळालेल्या भेटवस्तूचा अनबॉक्सिंग करतानाची पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
10 years at Apple pic.twitter.com/YYQNMzCBgx
— Marcos Alonso (@malonso) October 28, 2023
advertisement
व्हिडीओमध्ये पाहू शकता, बॉक्स उघडताच त्याला पहिले कार्ड मिळते ज्यावर लिहिलं होतं, 10 वर्षे पूर्ण केल्याबद्दल शुभेच्छा. यासोबतच त्यांच्या कामाचं कौतुक करण्यात आलं. भेटवस्तू म्हणून अॅपल साईन असलेलं सील्व्हर बटन देण्यात आलं होतं. याशिवाय स्मृतिचिन्हावर मार्कोसचे नाव आणि 10 वर्षे पूर्ण झाल्याची तारीख लिहिलेली आहे.
Apple कर्मचाऱ्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. पोस्टवर अनेक कमेंटही येताना दिसत आहे. एवढ्या नावाजलेल्या कंपनीत एवढे वर्ष पूर्ण करणं ही खरंच अवघड आणि कौतुकास्पद गोष्ट आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Nov 01, 2023 9:09 AM IST







