उत्तराखंडच्या जिम कॉर्बेटचा असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुमच्या अंगावरही नक्कीच काटा येईल. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ एका वाघाचा आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की दाट झाडीमधून एक वाघ अचानक बाहेर येतो आणि लोकांना पाहून जोरात गर्जना करू लागतो. ही गर्जना एवढी मोठी असते की तिथे उपस्थित लोकांचा थरकाप उडतो.
advertisement
हा व्हिडिओ ‘JoJu WildJunket’ नावाच्या अकाऊंटवरुन इंस्टाग्रामवर पोस्ट केला गेला आहे. हे वृत्त लिहिपर्यंत 20 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असं म्हटलं आहे, की जिम कॉर्बेटच्या गार्डियन झोनमध्ये एक शक्तिशाली वाघ भयंकर गर्जना करत होता. इन्स्टाग्रामवर 38 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे आणि कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने यावर कमेंट करत लिहिलं की, 'या प्रकारची गर्जना दाखवते की आपण माणसं या प्राण्यांना किती त्रास देतो.' तर दुसऱ्याने लिहिलं, 'ही गर्जना नाही तर त्याचा राग आहे.' आणखी एका यूजरने लिहिलं, 'जेव्हा वाघ अशा प्रकारे गर्जना करतो, तेव्हा आपण योग्य अंतर राखलं पाहिजे.'' याशिवाय इतर अनेक युजर्सनी यावर कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.