TRENDING:

एकीचे बळ अन् मजुरांची जिद्द, 10 टन ऊसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली 17 जणांनी ओढली, सांगलीतील अजब घटना

Last Updated:

ऊसतोड मजुरांनी एकजुटीचे बळ दाखवत तब्बल 10 टन ऊसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली 17 माणसांच्या ताकदीने ओढून काढल्याची अजब घटना सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील वाजेगाव येथे घडली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सांगली प्रतिनिधी,
advertisement

प्रीती निकम: ऊसतोड मजुरांनी एकजुटीचे बळ दाखवत तब्बल 10 टन ऊसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली 17 माणसांच्या ताकदीने ओढून काढल्याची अजब घटना सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील वाजेगाव येथे घडली. उदगीर शुगर अँड पॉवर लिमिटेड, पारे बामणी साखर कारखाना बंद होण्याच्या काही तास आधी हा थरारक प्रसंग पाहायला मिळाला. कारखाना बंद होणार असल्याने शेतकऱ्यांना आपला ऊस वेळेत गाळपासाठी पोहोचवण्याची घाई होती.

advertisement

वाजेगाव (ता. कडेगाव) येथील शेतकरी गंगाधर भिकाजी पाटणकर यांच्या शेतातील ऊस तोडणी पूर्ण झाली होती. मात्र,10 टन ऊसाने भरलेली ट्रॉली शेतात रुतल्याने मोठा पेच निर्माण झाला. दुपारी बारा पर्यंत ट्रॅक्टर कारखान्याच्या वाहनतळावर पोहोचणे आवश्यक होते. पहाटेच्या वेळी दुसऱ्या ट्रॅक्टरच्या मदतीने ट्रॉली बाहेर काढण्याचा विचार होता. मात्र, दुसरा ट्रॅक्टर उपलब्ध न झाल्याने 17 ऊसतोड मजुरांनी सोल बांधून ट्रॅक्टर ओढून बाहेर काढला.

advertisement

4500 सदस्य अन् 46 किलोमीटरचा परिसर, स्वच्छतेसाठी सोलापुरात अनोखी मोहिम, Video

एकीचे बळ अन् मजुरांची जिद्द

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पारंपरिक शेतीला दिला फाटा, केली खरबूज लागवड, शेतकऱ्याची लाखांत कमाई, Video
सर्व पहा

कारखान्याचे कर्मचारी सचिन कोळी, ऊसतोड मजूर आणि शेतकऱ्यांनी एकसंघ होत सोल बांधून ट्रॅक्टर ओढण्याचा प्रयत्न केला. दिघंची येथील ट्रॅक्टर मालक आणि चालक अमोल श्रीमंत पुजारी यांनीही या प्रयत्नात सहभाग घेतला. ट्रॅक्टरची शक्ती आणि मजुरांची मेहनत यामुळे ऊसाने भरलेली ट्रॉली बाहेर काढण्यात अखेर यश आले. ही घटना ऊसतोड मजुरांच्या जिद्द, मेहनत आणि संघटनशक्तीचे उत्कृष्ट उदाहरण ठरली.

advertisement

Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
मराठी बातम्या/Viral/
एकीचे बळ अन् मजुरांची जिद्द, 10 टन ऊसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली 17 जणांनी ओढली, सांगलीतील अजब घटना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल