4500 सदस्य अन् 46 किलोमीटरचा परिसर, स्वच्छतेसाठी सोलापुरात अनोखी मोहिम, Video

Last Updated:

प्रतिष्ठानच्या या स्वच्छता अभियान मोहिमेमध्ये एकूण 4486 इतक्या सदस्यांनी सहभाग घेतला होता. तसेच त्यांना स्वच्छतेसाठी लागणारे हॅन्ड ग्लोज, मास्क, खराटे, झाडू-टोपली, तळवटे, खोरे इत्यादी स्वच्छतेसाठी लागणारे साहित्य पुरवण्यात आले होते.

+
News18

News18

इरफान पटेल, प्रतिनिधी 
सोलापूर - डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा तालुका अलिबाग, जिल्हा रायगड यांच्या सौजन्याने सोलापूर शहरात भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले. प्रतिष्ठानच्या या स्वच्छता अभियान मोहिमेमध्ये एकूण 4486 इतक्या सदस्यांनी सहभाग घेतला होता. तसेच त्यांना स्वच्छतेसाठी लागणारे हॅन्ड ग्लोज, मास्क, खराटे, झाडू-टोपली, तळवटे, खोरे इत्यादी स्वच्छतेसाठी लागणारे साहित्य पुरवण्यात आले होते.
advertisement
प्रतिष्ठांनच्या वतीने एकूण 57 ट्रॅक्टर, 08 डंपर आणि 07 छोटा हत्ती या गाड्या स्वच्छतेसाठी वापरण्यात आल्या. प्रतिष्ठानच्या वतीने सर्व  सदस्यांसाठी थंडगार 04 पाण्याचे टँकरचे नियोजन करून त्याचे सर्व मार्गावर वाटप करण्यात येत होते. सोलापूर शहरात सकाळी 9 वाजल्यापासून ते सकाळी 11 वाजेपर्यंत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
advertisement
सोलापूर शहरातील मुख्य चौकांपासून ते प्रत्येक नगरात ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. सुका कचरा आणि ओला कचरा अशा दोन गटात वर्गीकरण करून हा कचरा संकलन केला जात आहे. ज्या ठिकाणी महानगरपालिकेने कचरा जमा करण्याची सोय केली आहे त्या ठिकाणी हा कचरा जमा केला जात आहे.
4500 सदस्यांनी एकत्र येत 46 किलोमीटरचा परिसर स्वच्छ करून 1 लाख 88 हजार 900 ओला आणि सूका कचरा जमा केला आहे. सोलापूरकरांनी आपण स्वतःहून राहत असलेला परिसर किंवा ठिकाण स्वच्छ ठेवला किंवा स्वच्छ केलास सोलापूर शहर हे नक्कीच सुंदर सोलापूर होईल, असे आवाहन संजय पवार यांनी केले आहे.
मराठी बातम्या/सोलापूर/
4500 सदस्य अन् 46 किलोमीटरचा परिसर, स्वच्छतेसाठी सोलापुरात अनोखी मोहिम, Video
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement