इंडोनेशियाचा राष्ट्रीय गुन्हेगारी कायदा समलैंगिकतेचे नियमन करत नाही, पण केंद्र सरकार आचेहमधील शरिया कायदा रद्द करू शकत नाही. आचेहने 2015 मध्ये इस्लामिक नियम आणि फौजदारी संहितेची व्याप्ती वाढवली, ज्यात शरिया कायदा गैर-मुस्लिमांनाही लागू करण्यात आला. या भागामध्ये गैर-मुस्लीम लोकसंख्या 1 टक्के आहे.
एएफपीने एका अहवालात म्हटले आहे की, प्रांतीय राजधानी बांदा आचेह येथील एका उद्यानात विविध आरोपांसाठी सार्वजनिकरित्या फटके मारण्यात आलेल्या १० इतर पुरुषांमध्ये हे पुरूष होते. या जोडप्याला रॅटन काठीने स्वतंत्रपणे फटके मारण्यात आले. एप्रिलमध्ये त्याच उद्यानात हे पुरूष सापडले होते, असे बांदा आचेह शरिया पोलिसांच्या कायदा अंमलबजावणी विभागाच्या प्रमुख रोस्लिना ए. जालिल यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. दोन्ही पुरुषांना आधी 80 फटक्यांची शिक्षा देण्यात आली होती, पण चार महिन्यांच्या तुरुंगवासामुळे त्यांची शिक्षा कमी करण्यात आली होती. सार्वजनिक उद्यानातील बाथरूममध्ये हे दोन्ही पुरुष एकमेकांना मिठी मारत होते, तसंच एकमेकांचं चुंबन घेत होते.
advertisement
याशिवाय इतर 8 जणांना व्यभिचार आणि जुगारासाठी सार्वजनिकरित्या फटके मारण्यात आले. एप्रिलमध्ये बांदा आचेह येथील तमन सारी सिटी पार्कमध्ये या पुरूषांना अटक करण्यात आली होती, जेव्हा रहिवाशांनी पोलिसांना सांगितले की त्यांनी त्या पुरूषांना त्याच उद्यानाच्या बाथरूममध्ये प्रवेश करताना पाहिले. पोलिसांना ते पुरूष चुंबन घेत आणि मिठी मारत असल्याचे आढळले. पार्कमध्ये भेटण्यापूर्वी, या जोडप्याने ऑनलाइन डेटिंग अॅपद्वारे संपर्क साधला, असे न्यायालयाच्या नोंदींमध्ये म्हटले आहे.
