थोड्यावेळाने मुलीची मैत्रिण खोलीबाहेर निघून गेली. पण त्यानंतर ही बराच वेळ झाला तरी आपली मुलगी का बाहेर आली नाही हे पाहण्यासाठी वडिलांनी हळूच खोलीचा दरवाजा उघडला आणि त्यांना आत जे दिसलं, त्याने ते पूर्णपणे हादरले.
खरंतर त्यांच्या 19 वर्षांच्या मुलीने गळफास लावून आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येआधी तिने भिंतीवर रक्ताने लिहिलं होतं ‘M+S’ हा एक कोड वर्ड होता, जो ना तिच्या वडिलांना कळाला ना पोलिसांना.
advertisement
हा धक्कादायक प्रकार लखनऊमधील तेलीबाग भागात घडला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं की, गेल्या वर्षभरापासून त्या तरुणीचे एका विवाहित महिलेसोबत संबंध होते.
शुक्रवारी ती महिला त्या मुलीच्या घरी आली होती. दोघी खोलीत गेल्या आणि काही वेळाने वाद झाला. महिला तिथून निघून गेली आणि थोड्याच वेळात ही भीषण घटना घडली.
वडिलांनी या विवाहित महिलेविरोधात तक्रार दाखल केली आणि पोलीस याप्रकरणाची चौकशी करत आहेत. मृत मुलीच्या मोबाईलमधील चॅट्स, फोटोज आणि त्या ‘M+S’ च्या अर्थाचा शोध घेण्यात येत आहे.
या घटनेने एक धक्का बसला फक्त एका कुटुंबालाच नाही, तर समाजालाही. प्रेम, नातं, ताणतणाव आणि मानसिक आरोग्य याबाबत विचार करायला भाग पाडणारी ही कहाणी आता सोशल मीडियावरही चर्चेचा विषय बनली आहे.
