TRENDING:

गळ्यात हार, कपाळावर टिळा, गावातून अनोख्या पद्धतीने या श्वानाला दिला निरोप, याठिकाणी नेमकं काय घडलं?

Last Updated:

मेरीने उदयपूर शहराजवळ नुकत्याच झालेल्या ओडा रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरणातही महत्त्वाची भूमिका बजावली होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
निशा राठोड, प्रतिनिधी
अनोख्या पद्धतीने या श्वानाला निरोप
अनोख्या पद्धतीने या श्वानाला निरोप
advertisement

उदयपुर : काही ठिकाणी जेव्हा विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची बदली होते, तेव्हा त्यांना उत्साहात निरोप दिला जातो. मात्र, एका ठिकाणी श्वानाला अनोखा निरोप देण्यात आला आहे. गळ्यात हार, कपाळावर टिळा लावत अनोख्या पद्धतीने या श्वानाला गावातून निरोप देण्यात आला.

सीआयडी विभागात नियुक्त स्नायपर मादी डॉग मेरीची उदयपूर येथून बदली करण्यात आली. आता मेरीला भरतपूरमध्ये सेवा द्यावी लागणार आहे. मागील 8 वर्षांपासून मेरी ही उदयपूरमध्ये तैनात होती. मेरीसोबत तिचा हँडलर राहुल सिंग यालाही भरतपूर सीआयडी झोनमध्ये पाठवण्यात आले आहे. हे दोघेही गुरुवारी सायंकाळी सहा वाजता मेवाड एक्स्प्रेसने भरतपूरकडे निघाले.

advertisement

मागील चार दिवसांत उदयपूरमध्ये 550 हून अधिक पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या पोलिसांच्या बदलीनंतर लोक ज्या प्रकारची भावना व्यक्त करत आहेत, अशाच भावना मेरीच्या सहकाऱ्यांनी दिल्या. यावेळी कुणाचे डोळे पाणावले, कुणी उदास वाटले. मेरीला पंचकुलामध्ये प्रशिक्षण देण्यात आले होते. याठिकाणी ती आपल्या गटात पहिल्या क्रमांकावर आली होती.

मेरीने उदयपूर शहराजवळ नुकत्याच झालेल्या ओडा रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरणातही महत्त्वाची भूमिका बजावली होती. तिच्या साडेसहा वर्षांच्या सेवेत तिने व्हीव्हीआयपी आणि झेड प्लस सुरक्षा कर्मचाऱ्यांसोबत कार्यक्रमांमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. इतकेच नव्हे तर उदयपूरमध्ये झालेल्या G-20 परिषदेतही तिने सुरक्षेची जबाबदारी पार पाडली.

advertisement

MNC मधील नोकरी गमावली, नंतर कधीच नोकरी न करण्याचा निर्णय घेतला, आता महिन्याला लाखोंची कमाई

हँडल बिलाल काय म्हणाले -

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याच्या दरात पुन्हा झाली वाढ, सोयाबीन आणि कांद्याला काय मिळाला आज भाव? Video
सर्व पहा

तर साडेसहा वर्षे मेरीसोबत वेळ घालवणारे हँडलर मोहम्मद बिलाल यांनी सांगितले की, निरोपाच्या वेळी मेरी निराश झाली होती. मेरीला तिची ड्युटी संपल्यावर भूक लागते तेव्हा ती मला पकडते आणि शेपूट हलवू लागली. आता ती भरतपूरला जाणार आहे, त्यामुळे तिला वाईट वाटत आहे. पण तीसुद्धा आपले कर्तव्य एका सच्च्या सैनिकाप्रमाणे करत आहे, असे ते म्हणाले.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
गळ्यात हार, कपाळावर टिळा, गावातून अनोख्या पद्धतीने या श्वानाला दिला निरोप, याठिकाणी नेमकं काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल