व्लॉगरने वंदे भारतच्या या स्लीपर कोच ट्रेनबद्दल बरंच काही सांगितले आहे. वंदे भारतच्या एक एसी स्लीपर कोचबद्दल बोलताना, कंटेंट क्रिएटर म्हणाले, "वंदे भारतच्या स्लीपर व्हर्जनचा आतील भाग पाहिल्यानंतर, फक्त एकच शब्द आहे: अद्भुत. काइनेक्टने डिझाइन केलेला हा प्रोटोटाइप 160 किमी प्रतितास ते कमाल 180 किमी प्रतितास वेग गाठू शकतो. लवकरच तुम्हाला तो ट्रॅकवर धावताना दिसेल."
advertisement
नवीन स्लीपर वंदे भारतची रचना आधुनिक, आकर्षक आणि प्रवाशांसाठी अनुकूल दिसते. व्लॉगरच्या व्हिडिओमध्ये, फर्स्ट-क्लास केबिन प्रीमियम दिसते, आरामदायी सीट्स, वॉटर बॉटल होल्डर, रिडिंग लाइट्स आणि चार्जिंग पॉइंट्स दिसतात.
@journeyswithak नावाच्या एका युझरने ही रील इंस्टाग्रामवर पोस्ट केली आणि लिहिलं, "वंदे भारतचे स्लीपर फर्स्ट क्लास केबिन, जिथे लक्झरी आणि टेक्नॉलॉजी एकत्र येतात! आकर्षक डिझाइन, उत्कृष्ट आराम आणि जागतिक दर्जाच्या सुविधा या केबिनला खरोखरच आकर्षक बनवतात. ही वंदे भारत म्हणजे शैली, जागा आणि स्मार्ट प्रवासाचं परिपूर्ण मिश्रण आहे!"
वंदे भारत स्लीपर कोचचा मार्ग अद्याप निश्चित झालेला नाही. पण काही मीडिया रिपोर्ट्सनुसार ही ट्रेन दिल्ली आणि पटना दरम्यान धावू शकते. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज हजारो लाईक्स मिळाले आहेत. तुम्हाला ही ट्रेन कशी वाटली आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.