इसाबेल कोल्स नावाची ही तरुणी. 2024 मध्ये एका डेटिंग अॅपद्वारे क्रिस्टोफर नावाच्या व्यक्तीशी तिची ओळख झाली. तो लष्करात होता. त्यांचं नातं चांगलंच रंगलं. त्यांनी एकमेकांशी लग्न केलं. अमेरिकन कपल त्याच्या हनिमूनला न्यू जर्सीला समुद्रकिनाऱ्यावर गेलं. तिथं ते अनेक दिवस प्रेम आणि संगीताच्या नशेत बुडून राहिले आणि नंतर घरी परतले.
बॉन्डेज रिलेशन ठेवताना पत्नीचा मृत्यू, जिम ट्रेनर पतीचा दावा, नेमका हा प्रकार काय?
advertisement
इथपर्यंत सगळं ठीक होतं. पण हनीमूनवरून परतल्यानंतर तिच्यासोबत जे घडणार आहे, त्याचा तिनं स्वप्नातही विचार केला नव्हता. एके दिवशी सकाळी उठल्यानंतर क्रिस्टोफर घाईघाईने कपडे पॅक करत होता. इसाबेलला हे खूप विचित्र वाटलं म्हणून तिनं त्याला विचारलं पण तो काहीच बोलला नाही, काहीच ऐकला नाही. तो जंगलाकडे जाऊ लागला. तिने तिच्या नवऱ्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो थांबला नाही.
ती आपल्या चपला घालून त्याच्या मागे जाईपर्यंत तिला समजलं की, तो एक पिस्तुलही घेऊन गेला आहे. तिला आणखी काही समजण्याआधीच तिच्या सासऱ्यांना क्रिस्टोफरचा मृतदेह सापडला.
अंत्यसंस्काराला गेली तरुणी आणि अल्पवयीन मुलासोबत ठेवले शारीरिक संबंध, नंतर घडलं असं की...
इसाबेलला विश्वासच बसत नव्हता कारण ते दोघंही एक कपल म्हणून खूप आनंदी होते. द सनच्या वृत्तानुसार, तिच्या पतीच्या मृत्यूनंतर, तिला कळलं की तो मानसिक आजारांनी ग्रस्त आहे आणि त्यामुळे त्याने स्वतःचा जीव घेतला.