अंत्यसंस्काराला गेली तरुणी आणि अल्पवयीन मुलासोबत ठेवले शारीरिक संबंध, नंतर घडलं असं की...

Last Updated:

Woman relation with minor boy : डिसेंबर 2024 मध्ये अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवले. नंतर जेव्हा ही बाब उघडकीस आली तेव्हा लोकांना धक्का बसला. जानेवारी 2025 मध्ये पोलीस तक्रारही दाखल करण्यात आली.

News18
News18
नवी दिल्ली : एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या जवळच्या व्यक्ती, नातेवाईक, मित्रपरिवार शोक व्यक्त करण्यासाठी, त्याला शेवटचा निरोप देण्यासाठी त्याच्या अंत्यसंस्काराला जातात. एक तरुणीही अशाच एका अंत्यसंस्काराला गेली. पण तिथं तिनं नको तेच कांड केलं. तिनं एका अल्पवयीन मुलासोबत अवैध संबंध ठेवले. जेव्हा ही बाब उघडकीस आली तेव्हा लोकांना धक्का बसला.
अमेरिकेच्या फ्लोरिडातील ही घटना आहे. पाम बीच काउंटीमधील ही 20 वर्षांची मुलगी, जिचं नाव आयला गोंझालेझ सॅलिनास आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये ती एका अंत्यसंस्काराला गेली. तिथं ती एका अल्पवयीन मुलाला भेटली. तिला तो आवडला. तिने त्याच्याशी मैत्री केली. यानंतर सोशल मीडियावर दोघांमध्ये संभाषण सुरू झालं. दोघांनी भेटण्याचा निर्णय घेतला.
डिसेंबर 2024 मध्ये अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवले. नंतर जेव्हा ही बाब उघडकीस आली तेव्हा लोकांना धक्का बसला. जानेवारी 2025 मध्ये पोलीस तक्रारही दाखल करण्यात आली. सुरुवातीला पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली. पोलीस तपासात असंही आढळून आलं की आयलाने प्रकरण लपवण्याचा प्रयत्न केला. पण तपासात ती दोषी आढळली. या प्रकरणी तिला अटक करण्यात आली आहे.
advertisement
याबाबत पाम बीच काउंटी शेरीफ कार्यालयाने सांगितलं की, हा मुलगा 12 ते 16 वर्षांच्या दरम्यान होता. यामुळे तर सात गंभीर आरोपांसह तुरुंगात पाठवण्यात आलं.
WPEC ने मिळवलेल्या कागदपत्रांनुसार, आयलावर अश्लील किंवा लैसिव्हियस बॅटरीचे सात आरोप लावण्यात आले होते. फ्लेहर्टी आणि मेरिफिल्ड क्रिमिनल डिफेन्सने सांगितलं की फ्लोरिडा कायद्यानुसार, या गुन्ह्यासाठी जास्तीत जास्त 15 वर्षांची शिक्षा होऊ शकते. मंगळवारी तिला पाम बीच काउंटी तुरुंगात ठेवण्यात आलं असले तरी बुधवारी त्याला जामिनावर सोडण्यात आले.
advertisement
फ्लोरिडामध्ये अशी घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी जुलैमध्ये 34 वर्षीय अॅलेक्सिस वॉन येट्सला तिच्या 15 वर्षांच्या सावत्र मुलाशी अनुचित संबंध ठेवल्याबद्दल अटक करण्यात आली होती. पोलिस अहवालानुसार, अॅलेक्सिसने दावा केला की तो मुलगा तिचा पती फ्रँकसारखा दिसत होता. अशा घटना यापूर्वीही घडल्या आहेत.
advertisement
आयलाच्या अटकेमुळे सोशल मीडियावर आणि स्थानिक समुदायात वादविवाद सुरू झाला आहे. अंत्यसंस्कारासारख्या प्रसंगी कोणी असं कृत्य कसं करू शकतं, असा प्रश्न अनेक लोक उपस्थित करत आहेत. पोलिसांनी सांगितले की, आयला आणि अल्पवयीन मुलीमधील संभाषणाचे पुरावे इतके मजबूत होते की हे प्रकरण लवकरच न्यायालयात पोहोचलं. जामिनावर सुटका झाल्यानंतर आयलाला आता एका दीर्घ कायदेशीर लढाईला सामोरं जावं लागेल, ज्यामुळे तिचं आयुष्य आणखी गुंतागुंतीचे होऊ शकतं.
मराठी बातम्या/Viral/
अंत्यसंस्काराला गेली तरुणी आणि अल्पवयीन मुलासोबत ठेवले शारीरिक संबंध, नंतर घडलं असं की...
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement