कर्मचाऱ्याला काय सापडलं?
लखनऊ-बरौनी एक्सप्रेसच्या एसी कोचमध्ये कमी कूलिंग असल्याच्या तक्रारीवरून समोर आलेली बाब अतिशय धक्कादायक होती. कर्मचाऱ्याने एसीच्या तपासणीसाठी एसी डक्ट उघडला तेव्हा त्यांना धक्काच बसला. या एसी डक्टमध्ये मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या लपवलेल्या आढळल्या. नंतर संपूर्ण कोचची झडती घेण्यात आली, ज्यामध्ये एकूण 150 हून अधिक बाटल्या जप्त करण्यात आल्या. विशेष म्हणजे या ट्रेनमध्ये यापूर्वीही दारू तस्करीच्या घटना समोर आल्या आहेत, परंतु लखनऊ स्टेशनवर अशा प्रकारची घटना पहिल्यांदाच पकडली गेली आहे.
advertisement
मंगळवारी 2AC कोचच्या (ए-२) सीट क्रमांक 40 वर प्रवास करणाऱ्या विपिन कुमारने कूलिंग नसल्याची तक्रार केली होती. तांत्रिक कर्मचारी बुधवाल स्टेशनच्या पुढे ट्रेनमध्ये चढले आणि तपासणी सुरू केली. जेव्हा त्यांनी एसी डक्ट उघडला तेव्हा त्यात कागदात गुंडाळलेल्या काही बाटल्या दिसल्या. कागद काढल्यावर स्पष्ट झाले की या ऑफिसर्स चॉइस ब्रँडच्या दारूच्या बाटल्या आहेत.
व्हिडीओ व्हायरल, चौकशीचे आदेश...
या प्रकरणाचा तपास आता आरपीएफ आणि स्थानिक पोलीस करत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर दारुच्या बाटल्या कोी आणल्या, कोणी ठेवल्या, याची चौकशी सुरू झाली आहे. हे प्रकरण अतिशय गंभीर असल्याचे आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ही दारू बिहारमध्ये नेली जात होती. बिहारमध्ये दारू बंदी आहे. मे महिन्यातही याच ट्रेनमध्ये दारुचा मोठा साठा सापडला होता. त्यावेळी दारूचे 700 ट्रेटा पॅक सापडले होते. या प्रकरणातील आरोपी हा त्याच ट्रेनमधील जनरेटर प़ॉवर क्रूचा सदस्य होता.