TRENDING:

मे-जूनमध्ये काही खरं नाही! देशातील बड्या तज्ज्ञाची चिंताजनक भविष्यवाणी

Last Updated:

Prediction about summer heat : भारतातील एका टॉप तज्ज्ञाने मे-जूनबाबत अशी भविष्यवाणी केली आहे. ज्यामुळे चिंता अधिक वाढली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : उन्हाळा अद्याप सुरू झालेला नाही, पण त्याआधीच आता टेन्शन वाढू लागलं आहे. याचदरम्यान भारतातील एका टॉप तज्ज्ञाने मे-जूनबाबत अशी भविष्यवाणी केली आहे. ज्यामुळे चिंता अधिक वाढली आहे. भारतातील अव्वल ग्रीड ऑपरेटरने मे-जून या दोन महिन्यांत विजेचा तीव्र तुटवडा निर्माण होऊ शकतो, असा इशारा दिला आहे.
News18
News18
advertisement

नॅशनल लोड डिस्पॅच सेंटरच्या अहवालानुसार, सौरऊर्जा नसेल त्याकाळात वीज मागणी आणि पुरवठ्यामध्ये 15-20 गिगावॅट्स (जीडब्ल्यू) ची कमतरता असू शकते.

सौरऊर्जा निर्मितीमुळे दिवसा मागणी पूर्ण होण्यास मदत होते, परंतु त्याच्या अस्थिरतेमुळे संध्याकाळी आणि सकाळच्या वेळी वीजटंचाई निर्माण होऊ शकते. त्याच वेळी भारताची बेसलोड वीज निर्मिती क्षमता जी प्रामुख्याने कोळशावर आधारित प्रकल्पांवर अवलंबून आहे, गेल्या काही वर्षांपासून स्थिर राहिली आहे, ज्यामुळे सौरऊर्जेशिवाय इतर वेळी वीज मागणी पूर्ण करणं कठीण झालं आहे.

advertisement

बापरे! पर्यटक काय पोलीसही घाबरून पळू लागले, ताजमहलमध्ये असं काय घडलं? Watch Video

इंडियन एक्सप्रेसने एनएलडीसीच्या एका अहवालाचा हवाला देत म्हटलं आहे की या वर्षी मे महिना सर्वात कठीण महिना ठरेल. या पुढील महिन्यांतही विजेची मोठी मागणी असेल. या महिन्यांत वीज मागणी सर्वाधिक असल्याने आणि अक्षय ऊर्जा निर्मितीमध्ये संभाव्य चढउतारांमुळे सिस्टममधील कमजोरी वाढू शकते.

advertisement

वीज संकटाची तीव्रता

अहवालानुसार मे 2025 मध्ये, लोड लॉस प्रोबॅबिलिटी (LOLP) म्हणजेच वीज पुरवठा मागणीपेक्षा कमी असण्याची शक्यता 19% आहे, तर सरासरी परिस्थितीत ती 31% पर्यंत वाढू शकते. जूनमध्येही हा धोका 4.7% ते 20.1% पर्यंत असू शकतो. विजेचा तुटवडा प्रामुख्याने मे आणि जुलैमध्ये दिसून येईल, जो अनेकदा 15 गिगावॅटपेक्षा जास्त असू शकतो. सौरऊर्जेच्या वेळेत ग्रिडला पुरेसा पुरवठा होत असल्याने, सौरऊर्जेच्या वेळेत ही कमतरता विशेषतः सौरऊर्जा नसलेल्या वेळेत उद्भवण्याची शक्यता असते.

advertisement

वीज साठवणूक उपाय आवश्यक

या उन्हाळ्यात विजेची मागणी गेल्या वर्षीच्या 250 गिगावॅटपेक्षा 270 गिगावॅटपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत ग्रीड व्यवस्थापकांसाठी हा एक आव्हानात्मक काळ ठरू शकतो. आताच खबरदारीचे उपाय केले नाहीत तर मोठ्या प्रमाणात लोडशेडिंग करावं लागू शकतं.

ग्रीडवरील दबाव कमी करण्यासाठी डिमांड साइड मॅनेजमेंटचा अवलंब करण्याची शिफारस अहवालात केली आहे. ज्यामध्ये औद्योगिक आणि व्यावसायिक युनिट्सना वीज वापर नॉन-पीक अवर्समध्ये स्थानांतरीत करण्यासाठी प्रोत्साहित केलं जाऊ शकते.

advertisement

बजेट घाम फोडणार नाही, फिलही थंडा थंडा कूल कूल, 900 रुपयांत खरेदी करा कुलर, इतका स्वस्त कुठे मिळतोय पाहा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिताय? शरीराला कसा होतो फायदा? संपूर्ण माहितीचा Video
सर्व पहा

या संकटाचा सामना करण्यासाठी, केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने (CEA) 18 फेब्रुवारी रोजी एक महत्त्वाचा सल्ला जारी केला आहे. ज्यामध्ये सौर ऊर्जा प्रकल्पांसह बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम - BESS आणि पंप्ड स्टोरेज प्लांट - PSP या ऊर्जा साठवण प्रणाली बसवण्याची शिफारस करण्यात आली आहे. या प्रणाली दिवसा जास्तीची सौर ऊर्जा साठवू शकतात आणि रात्री किंवा मागणी वाढल्यास ती पुन्हा ग्रीडमध्ये सोडू शकतात.

मराठी बातम्या/Viral/
मे-जूनमध्ये काही खरं नाही! देशातील बड्या तज्ज्ञाची चिंताजनक भविष्यवाणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल